वाघाच्या बछड्याच्या नामकरणासाठी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी, वनमंत्र्यांनी केली बाद! अजित पवार म्हणाले कानावर हात!

वाघाच्या बछड्याच्या नामकरणासाठी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी, वनमंत्र्यांनी केली बाद! अजित पवार म्हणाले कानावर हात!
Updated on

छत्रपती संभाजीनगर: शिवसेना पक्ष फुटल्यानंतर राज्यात वर्षभरापूर्वी शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले, तेव्हापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडून सरकारसह शिंदे गटातील नेत्यांवर टीकास्त्र सुरू आहे. त्यात भाजप नेतेदेखील ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

रविवारी सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील वाघाच्या बछड्यांच्या नामकरणासाठी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी निघाली. चिठ्ठीतील नाव पाहताच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने हे नाव नको म्हणून दुसरी ‘विक्रम’ नावाची चिठ्ठी काढली!

सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील ‘समृद्धी’ नावाच्या पिवळ्या वाघिणीने एका बछड्याला तर पांढऱ्या ‘अर्पिता’ वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला होता. दरम्यान, यातील एका बछड्याचा मृत्यू झाला. त्यामुळे तीन बछड्यांचे नामकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (ता.१७) करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

वाघाच्या बछड्याच्या नामकरणासाठी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी, वनमंत्र्यांनी केली बाद! अजित पवार म्हणाले कानावर हात!
Sharad Pawar : बबन घोलपांच्या मुलाने घेतली शरद पवारांची भेट; ठाकरे गटाच्या नाराज नेत्याला पवार बळ देणार का?

महापालिकेने नावे कळविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. या चिठ्ठ्या एका भांड्यात ठेवण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी पहिली चिठ्ठी काढली. त्यात ‘श्रावणी’ नाव निघाले. पिवळ्या वाघिणीच्या बछड्याला हे नाव देण्यात आले. त्यानंतर दुसरी चिठ्ठी अजित पवार यांनी काढली. त्यात ‘आदित्य’ हे नाव निघाले. हे नाव पाहताच मुनगंटीवार यांनी हे नाव नको, असे म्हणत ती चिठ्ठी बाजूला ठेवून दुसरी काढली. त्यात ‘विक्रम’ हे नाव निघाले. तिसरी चिठ्ठी सुधीर मुनगंटीवार यांनी काढली. त्यात ‘कान्हा’ हे नाव निघाले. पांढऱ्या वाघिणीच्या बछड्यांना ही नावे देण्यात आली.

अजित पवार म्हणाले, मला काहीच माहीत नाही!

‘आदित्य’ नावाची चिठ्ठी बाजूला का करण्यात आली? असा प्रश्‍न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यांनी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर अजित पवार यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी कानावर हात ठेवून ‘मला काही आठवत नाही’ असे सांगितले!

वाघाच्या बछड्याच्या नामकरणासाठी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी, वनमंत्र्यांनी केली बाद! अजित पवार म्हणाले कानावर हात!
Eknath Shinde : मनोज जरांगेंची मागणी असली, तरी मराठ्यांना OBC तून सरसकट आरक्षण मिळणार नाही; CM शिंदेंचं मोठं विधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.