Aurangabad Crime : पोलिस ठाण्यासमोर बहिणीने भावाला बेदम चोपले

चक्क पोलिस ठाण्यासमोर झालेल्या या फ्रि स्टाईलमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.
Aurangabad Crime Updates
Aurangabad Crime Updatesesakal
Updated on

वाळूज (जि.औरंगाबाद) : पुढील शिक्षणासाठी टीसी घेण्यासाठी आलेल्या मुलीला टीसी न देता, तु येथेच राहूण शिक्षण घे, असे म्हणत, मुलीला मामाकडे जाण्यास मज्जाव करत मुलीसह भावाला बहिणेने बेदम चोपले. चक्क एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोरच (MIDC Waluj Police Station) घडलेल्या या फ्रि-स्टाईलमुळे पोलिस ठाण्यात मोठी खळबळ उडली. ही घटना शनिवारी (ता.११) दुपारी तीन वाजेच्या सुमारास एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोर घडली. दाहवीत शिकणारी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी गेल्या काही महिन्यापूर्वी बजाजनगर (Bajajnagar) येथे आई रामकौर विलास जाधवकडे राहत होती. मात्र आईची वागणुक पसंत नसल्याने मुलगी मामाच्या गावी बेलगाव (ता.केज, जि.बीड) (Beed) येथे गेली होती. ती मामा नकुस नरहरी टोणगे व आजी कमल नरहरी टोणगे यांच्याकडेच राहून पुढील शिक्षण घेणार होती. त्यासाठी ती टीसी घेण्यासाठी बजाजनगरात आली होती. (Aurangabad)

Aurangabad Crime Updates
काय खावे हे ठरवणार का, उच्च न्यायालयाने अहमदाबाद पालिकेला फटकारले

मात्र तिला टीसी न देता, तू मामाकडे जाऊ नको. येथेच राहून शिक्षण घे, असा आग्रह तिची आई रामकौर जाधव हिने धरला होता. मात्र ती मामाकडे जाण्यावर ठाम होती. दरम्यान यावर एकमत न झाल्याने मुलीसह आई रामकौर जाधव व मामा नकुस टोणगे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. ते पोलिस ठाण्यात आल्यांनतर ही त्यांच्यातील वाद सुरूच होता. हा वाद विकोपाला गेल्याने रामकौर हिने अल्पवयीन मुलीसह भाऊ नकुस टोणगे याला चपलाने बेदम चोपले. शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चक्क पोलिस ठाण्यासमोर झालेल्या या फ्रि स्टाईलमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वाना ताब्यात घेतले.

फोटो - पोलीस ठाण्यासमोर भावाला बेदम चोपतांना बहिण. (छाया - आर के भराड, वाळूज.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.