Chhatrapati Sambhaji Nagar : लोकसंख्या १७ लाख, स्वच्छतागृहे फक्त ३४

अनेक ठिकाणी पडझड झाल्याने वापर बंद; दहा वर्षांपासून याद्या कागदावरच
smart city sambhajinagar population 17 lakh toilet only 34 health
smart city sambhajinagar population 17 lakh toilet only 34 healthsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहराची लोकसंख्या १७ लाखांच्या घरात गेली. दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक हजेरी लावतात, वाढत्या औद्योगिकरणासोबतच मेडिकल हब अशी छत्रपती संभाजीनगर शहराची नवी ओळख तयार होत आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुमारे एक हजार कोटींची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

पण, दहा वर्षांत शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचा प्रश्‍न मिटू शकलेला नाही. महापालिकेने स्वच्छतागृह उभारण्याच्या केलेल्या घोषणा हवेतच विरल्या आहेत. त्यामुळे ‘स्मार्ट’ शहरात महिला, नागरिकांचा सांगा आम्ही कुठे जायचे? हा प्रश्‍न कायम आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. शहरात ३४ सार्वजनिक स्वच्छतागृह असून, त्यापैकी बहुतांश स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे वापर बंद आहे.

मुख्य बाजारपेठ असलेल्या औरंगपुरा, गुलमंडी, टिळकपथ, निराला बाजार, शहागंज, सिटी चौक परिसरात काही ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत. पण, त्यांची अवस्था एवढी वाईट आहे, त्याठिकाणी सर्वसामान्य नागरिक जाऊच शकत नाहीत, अशी अवस्था आहे. विशेषतः काही स्वच्छतागृह कोपऱ्याकापऱ्यात असल्याने याठिकाणी जाण्याची महिलांची हिंमतच होत नाही.

निधी भरपूर, पण कामाची कासवगती

स्वच्छ  अभियानांतर्गत अत्याधुनिक  स्वच्छतागृह  उभारण्यासाठी महापालिकेला पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून शासकीय कर्करोग रुग्णालय, पीर बाजार, कांचनवाडी, सिद्धार्थ उद्यान, कबीरनगर, डॉ. सलीमअली सरोवर, पिया मार्केट, सिडको एन-११ भाजीमंडई, नेहरू गार्डन अण्णा भाऊ साठे चौक,

क्रांतिनगर, सिडको एन-१ सिग्नल (एसबीआय बॅकेजवळ पाणपोई) अशा ११ ठिकाणी स्वच्छतागृह बांधले जाणार आहेत. त्यासोबतच राज्य शासनाकडून मिळालेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीतून टाऊन हॉल, मोंढानाका, रेल्वेस्टेशन, एपीआय कॉर्नर, शहानुरमिया दर्गा चौकातील संग्रामनगर या पाच उड्डाणपुलाखाली स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, अद्यापपर्यंत एकाही स्वच्छतागृहाचे काम सुरू झालेले नाही.

युरिनलच्या दुर्गंधीची चौकाचौकांत शिक्षा

तत्कालीन प्रशासक तथा विद्यमान जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ५० स्वच्छतागृह महिलांसाठी तर पुरुषांसाठी ५० युरिनल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक चौकात हे प्लॅस्टिकचे युरिनल बसविण्‍यात आले. पण यातील एकाही युरिनल ड्रेनेजला जोडलेले नाही. त्यावर बसविण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या शोभेच्या बनल्या आहेत. त्यामुळे शहराच्या अनेक चौकात नागरिकांना युरिनलमधून सुटलेल्या दुर्गंधीचा त्रासाची शिक्षा सहन करावी लागत आहे.

महिलांसाठी स्वच्छतागृहांचे भिजत घोंगडे

महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यासंदर्भात महिला व बालकल्याण विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. पाच ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यासाठी जागाही निश्चित करण्यात आल्या. अतिक्रमणे व इतर अडचणीमुळे यातील फक्त दोन स्वच्छतागृहाचे काम पूर्ण झाले. इतर स्वच्छतागृह मात्र अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत.

शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्त्यांसह वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. २१ ठिकाणी आगामी वर्षभराच्या आत अत्याधुनिक सुविधा असलेल्या स्वच्छतागृहांची कामे पूर्ण होतील.

— ए. बी. देशमुख, शहर अभियंता महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.