Smart Meter For Water Tap : नळाला स्मार्ट मीटर, पण मोजा 10 हजार; महापालिका काढणार ४०० कोटींची निविदा

नव्या २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळांना २४ तास ७ दिवस पाणी देण्यात येईल, असा दावा केला जात आहे. त्यासोबतच सर्व नळांना स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत.
Smart Meter For Water Tap
Smart Meter For Water Tapsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नव्या २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळांना २४ तास ७ दिवस पाणी देण्यात येईल, असा दावा केला जात आहे. त्यासोबतच सर्व नळांना स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत.

मीटर बसविण्याची निविदा प्रक्रिया महापालिकेमार्फत राबविण्यात येणार असून, गुंठेवारी भागात मोफत तर उच्चभ्रू वसाहतींमध्ये स्मार्ट मीटरसाठी सुमारे १० हजार रुपये घेतले जाणार आहेत. मीटरसाठी ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे. २७४० कोटी रुपयांची ही योजना असून, यातील पहिल्या टप्प्याचे काम हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला देण्यात आले आहे.

योजनेचे आतापर्यंत ७४ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील ११ जलकुंभांपैकी सहा जलकुंभ महापालिकेच्या ताब्यात देण्याची तयारी सुरू आहे तर डिसेंबरपर्यंत योजनेद्वारे किमान २०० एमएलडी पाणी शहरात येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ज्या भागात जलकुंभाची कामे पूर्ण झाली आहेत, तिथे नव्या योजनेतून नळ कनेक्शन दिली जात आहेत. सुरवातीला नक्षत्रवाडी भागात २४ तास सात दिवस पाण्याचा प्रयोग करण्याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तयारी आहे. चोवीस तास पाणी देताना सुमारे २ लाख ८० हजार नळांना स्मार्ट मीटर लावले जाणार आहेत.

यासंदर्भात प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले, ‘‘नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टेक्निकल कामांसाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र, महापालिकेने स्मार्ट वॉटर मीटर खरेदीचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ४०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. ही निविदा तांत्रिक विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

गुंठेवारी भागासाठी मोफत योजना

शहरात २ लाख ८० हजार मालमत्ताधारक असून, यातील गुंठेवारी मालमत्ताधारकांना व जे नागरिक प्राप्तिकर भरत नाहीत, अशांना मोफत मीटर दिले जाणार आहेत. मात्र बंगले, मोठे भूखंडधारकांकडून स्मार्ट वॉटर मीटरसाठी दहा हजार रुपये शुल्क आकारले जाईल. स्मार्ट मीटरसाठी वसूल केले जाणारे शुल्क स्क्रोल खात्यात जमा करून ते कंत्राटदार एजन्सीला देण्यात येतील, असे प्रशासकांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.