'एसएनडीटीचा' मराठवाड्यातही विस्तार

औरंगाबाद, परभणी, लातूर, जालना, नांदेडमध्ये नवी महाविद्यालये
SNDT Women University Expansion Marathwada
SNDT Women University Expansion Marathwadasakal
Updated on

मुंबई : महिलांच्या शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) राज्यातील कार्यक्षेत्रात यंदा विस्तार होणार आहे. मुलींच्या पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी वार्षिक बृहत् आराखड्यात नव्या महाविद्यालयांमार्फत मराठवाड्यात जाळे विणले जाणार आहे. औरंगाबाद, परभणी, लातूर, जालना, नांदेड जिल्ह्यांत सर्वाधिक नवी महाविद्यालये स्थापन होणार असल्याचे बृहत् आराखड्यातून समोर आले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांसाठी वार्षिक बृहत् आराखडा मंजूर केला. त्यात मुंबई विद्यापीठानंतर सर्वाधिक नव्या महाविद्यालयांसाठी एसएनडीटी विद्यापीठाने २०३ महाविद्यालयांची बिंदू नामावली दाखवली आहे. यासाठी विद्यापीठाने ३० एप्रिलपर्यंत राज्यातील संस्था, महाविद्यालयांनी आपल्याकडे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत.

एसएनडीटीने जाहीर केलेल्या नव्या महाविद्यालयांच्या बिंदू नामावलीत मराठवाड्याचा अपवाद वगळता रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत एकही नव्या महाविद्यालयांसाठी बिंदू नामावली दाखवलेली नाही. दुसरीकडे नागपूर- २, अकोला- ४, अमरावती- ३, बुलढाणा- ७, गडचिरोली- २, वर्धा- १, वाशिम- ४ आणि नागपूरसाठी केवळ एकच नव्या महाविद्यालयासाठी बिंदू नामावली दाखवण्यात आली आहे.

औरंगाबादेत सर्वाधिक २९ महाविद्यालये

मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये एसएनडीटी विद्यापीठाने बिंदू नामावली दाखवली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २९, त्या खालोखाल बीड २३, जालना १७ तसेच नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यांत प्रत्येकी १० नव्या महाविद्यालयांसाठी बिंदू नामावली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणासाठी एसएनडीटीचे मोठे जाळे निर्माण होणार आहे.

बृहत् आराखड्यातील अभ्यासक्रम

पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत पदवी, पदव्युत्तर आणि अल्प मुदतीचे अभ्यासक्रम, डिझाईन, होम सायन्स, क्लिनिकल लॅब, बीबीए, बीसीए, बी.फार्मसी, मास मीडिया, बीएमए, बीएसडब्ल्यू, बीपीएड, एमपीएड, एलएलबी आदी अभ्यासक्रमांचा बृहत् आराखड्यात समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()