लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : लासूर स्टेशन (ता.गंगापूर) येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते नितीन दत्तात्रय जाधव (वय ३२) यांचे रविवारी (ता.सहा) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुचाकीवरून सावंगी चौकाकडे जात असताना ट्रॅक्टरच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाला.अत्यंत सुस्वभावी व सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणाऱ्या नितीनचे अपघातात निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. शिल्लेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन जाधव हे दुचाकीवरून लासुर स्टेशनकडून सावंगी चौकाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. (Social Activist Nitin Jadhav Died In Accident In Gangapur Taluka Of Aurangabad)
त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या शिवना हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी नितीन जाधव यांना मृत घोषित केले. या अपघातात ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर घटनास्थळी न थांबवता गंगापूरच्या (Gangapur) दिशेने पळून गेला. पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी प्रसंगावधान राखून पोलीस सहकाऱ्यांना या ट्रॅक्टरचा तात्काळ शोध घेण्यासाठी पथक पाठवले असता हे ट्रॅक्टर तांदुळवाडी येथे ताब्यात घेतले व शिल्लेगाव पोलीस ठाण्यात आणून जमा केले. ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर सोडून पळून गेला असून शिल्लेगाव पोलीस तपास करीत आहेत.
जीवाचा पर्वा न करता लोकांना मदत
नितीन जाधव हा तसा काँग्रेसचा (Congress Party) कार्यकर्ता होता. मात्र कधीही पक्षीय लेबल न लावता सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असायचा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वत्र भयावह वातावरण असताना लॉकडाऊन दरम्यान जीवाची पर्वा न करता गावातील सुरक्षा, कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी मनापासून धडपडला होता. सध्याही महावितरणच्या वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांसाठीही पाठपुरावा करून रोहित्र मिळवून देणे, नियमित वीज मिळावी म्हणून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सहकार्य करत लढत होता.अगदी परवा सावंगी परिसरात हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत शेतकरी बांधवांच्या प्रश्नांबाबत भरभरून बोलला. शेतकऱ्यांना नियमित वीज मिळावी यासाठी भाषणही केले व सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या. या सर्व घडामोडी शेवटच्या ठरतील अशी कोणी कल्पनाही केली नसेल. मात्र या अपघाताने एक सच्चा कार्यकर्ता हिरावून नेला. नितीनच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आईवडील असा मोठा परिवार आहे. गावातून या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (Aurangabad News)
अतिक्रमणांमुळे अपघात
सावंगी चौकातील चारही बाजुंनी रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दुकाने, हॉटेल, वडेपाव, फळे आदी विक्रेत्यांनी पुढे येत केलेल्या अतिक्रमणामुळे अरुंद रस्त्यावर ग्राहकांची वाहनेही उभी असतात. परिणामी वाहन चालवणे जिकिरीचे बनले असून असे अपघातही घडत आहेत. त्यात रेल्वेचे फाटक बंद असल्यास तर वाहनांची मोठी कोंडी होते आणि फाटक उघडताच वाहने काढतानाही अनेकदा अपघात होतात. हा रस्ता दुतर्फा मोकळा असणे गरजेचे आहे. हे या घटनेच्या निमित्ताने दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.