सोयगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत गुरुवारी होणार जाहीर

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
Soygaon Nagarpanchayat President
Soygaon Nagarpanchayat Presidentesakal
Updated on

सोयगाव (जि.औरंगाबाद) : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) व राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सोयगाव नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यात सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बहुमत मिळविले आहे. सोयगाव नगरपंचायत (Soygaon Nagarpanchayat) नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत गुरुवारी (ता.२७) सायंकाळी चार वाजता मंत्रालय, मुंबई येथे काढण्यात येणार असल्याचे निर्देश मंगळवारी सोयगाव तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे. सोयगाव नगरपंचायतसाठी दोन टप्प्यात ता.२१ डिसेंबर आणि ता.१८ जानेवारीला मतदान झाले होते. या सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी आता नगराध्यक्षपदाची (Aurangabad Update) सोडत जाहीर करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता.२७) दुपारी चार वाजता मंत्रालयात जाहीर होत आहे. प्रधान सचिव नगरविकास-२ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात येणार असल्याचे मंगळवारी प्राप्त आदेशात म्हटले आहे.(Soygaon Nagarpanchayat President Reservation Lucky Draw On Thursday Aurangabad News)

Soygaon Nagarpanchayat President
सेलूत सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प २२ गावांतील शेतकर्‍यांना ठरतोय वरदान

या सोडतीच्या ऑनलाईन बैठकीसाठी कोविड-१९ च्या संक्रमणाचा प्रादुर्भाव पाहता विहित केलेले आरोग्यविषयक निकष विचारात घेता सदर सोडतीसाठी संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी संबंधित जिल्ह्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेशात सूचित करण्यात आले आहे. सदर सोडतीची प्रक्रिया ऑनलाईन बैठकीद्वारे पार पडणार असून संबंधित जिल्ह्यांच्या विभागीय कार्यालयात दूरदृश्यप्रणालीची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रधान सचिव यांनी दिल्या आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालयातील कर्मचारी आणि नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील १० लोकप्रतिनिधींना विभागीय कार्यालयात प्रवेश निश्चित केला आहे.

Soygaon Nagarpanchayat President
मराठवाड्याचे सुपूत्र आनंद भालेराव राजस्थान केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरुपदी

नगराध्यक्षपदाच्या सोडतीची उत्कंठा

सोयगाव नगरपंचायतवर शिवसेनेचे बहुमत स्पष्ट झालेले असून १७ पैकी ११ जागांवर शिवसेनेने विजय मिळविलेला आहे. त्यामुळे आता सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडतीकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे उत्कंठा वाढली आहे. भाजपकडे सहा जागा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या एकहाती सत्ता असल्याने नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपद हे शिवसेनेच्या ताब्यात राहणार आहे. त्यामुळे या निवडीची औपचारिकता शिल्लक राहिली असून नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे आरक्षित होते. याकडे मात्र शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()