धक्कादायक! हॉलतिकिटसाठी १० वीच्या विद्यार्थ्याकडे मागितले ३० हजार

SSC exam
SSC exam
Updated on
Summary

हॉलतिकिटसाठी विद्यार्थ्याची अडवणूक करत ३० हजार रुपयांची मागणी करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षेत केमिस्ट्रीच्या पेपरफुटीची घटना ताजी आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावी परीक्षेच्या हॉलतिकिटासाठी विद्यार्थ्याकडे ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. औरंगाबादमध्ये या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. आजपासून दहावीची परीक्षा सुरु झालीय, पण परीक्षेआधी घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकिटसाठी अडवून त्यांच्याकडून पैसै मागणाऱ्या संस्थाचालकाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जवळपास दोन वर्षानंतर दहावीच्या परीक्षा ऑफलाइन होत आहेत. अशा परिस्थितीत हॉल तिकिटसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या संस्थाचालकाला अटक केली आहे. कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एसपी जवळकर असे त्यांचे नाव आहे. त्यांनी एका विद्यार्थ्याकडे हॉलतिकिट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली. यापैकी १० हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी त्यांना अटक केली. जवळकर यांच्यासह शाळेतील लिपिक सविता खामगावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SSC exam
शिक्षकाचा मोठ्या बहिणीवर बलात्कार, धाकटीचा विनयभंग

राज्यात आजपासून दहावीची परीक्षा सुरु झाली असून तब्बल १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थी बसले आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्यात आला आहे. ७० ते १०० गुणांच्या लेखी पेपरसाठी ३० मिनिटे आणि ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वेळ जास्त असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.