छत्रपती संभाजीनगर : यंदाची दिवाळी एसटी महामंडळाला चांगलीच पावली आहे. १ ते २१ नोव्हेंबर दरम्यान महामंडळास २० कोटी ५१ लाख २८ हजारांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत उत्पन्नात तब्बल १ कोटी २५ लाख ६२ हजारांनी वाढ झाली आहे. या काळात एकूण ३८ लाख ५० हजार किलोमीटरचा प्रवास एसटीने पूर्ण केला.