औरंगाबाद : कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येस मंत्री परब जबाबदार

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते : एसटी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते : एसटी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते : एसटी विलीनीकरणाच्या मागणीवर ठामsakal
Updated on

औरंगाबाद : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मुख्य मागणीसोबत इतर मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या जवळपास ५० कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येसाठी परिवहनमंत्री अनिल परब जबाबदार असल्याचा आरोप ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. मंगळवारी (ता.१४) त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकात संपकरी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणाचा लढा आम्ही जिंकणारच, असा दावा त्यांनी केला.

आपल्या मागण्यांसाठी दिवाळीपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. मंत्री अनिल परब यांच्या आडमुठेपणामुळे ५० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. परब यांच्यावर आत्महत्येप्रकरणी पोलिस महासंचालक, सीबीआय प्रमुखांनी कारवाई करावी. एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू असून येत्या २० डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी राज्य शासनाने भारतातीलच नव्हे तर जगातील पाच तज्ज्ञ वकिलांना उभे केले तरी आमच्या लढ्याला यश येईल.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते : एसटी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम
‘ओबीसी’ डेटासाठी ‘मराठा’ फार्म्युला?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच विलीनीकरणास विलंब होत असल्याचा आरोप ॲड. सदावर्ते यांनी केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर, अण्णा हजारे, विविध संघटना आमच्या बाजूने बोलत आहेत. मंत्री अनिल परब यांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांना निलंबित, सेवासमाप्ती केली जात आहे. हे सर्व बेकायदेशीर आहे, असेही त्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांची घोषणाबाजी

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मंगळवारी दुपारी मध्यवर्ती बसस्थानक येथे भेट देऊन संपकरी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डंके की चोट पर विलीनीकरण झालेच पाहिजे, जय भीम, एक मराठा लाख मराठा, जय श्रीराम, हम है हिंदुस्थानी, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते : एसटी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम
China Corona: चीनमध्ये पाच लाख लोकांचे क्वारंटाइन

औरंगाबाद नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर म्हणा

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या भाषणात शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला. एस. टी. कर्मचाऱ्यांसह सर्वांनी आजपासून औरंगाबाद नव्हे तर छत्रपती संभाजीनगर असा शहराचा उल्लेख करावा. संभाजीनगर हा उल्लेख एकेरी न करता आदरपूर्वक छत्रपती संभाजीनगर करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()