६०० कोटींची घोषणा, तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षाच

कोरोनामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाले आहे. त्यामुळेच शासनाला वेतनासाठी वारंवार निधी द्यावा लागत आहे
parivahan
parivahan
Updated on

औरंगाबाद: कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळातील (maharashtra state transport) कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनावर अवलंबून राहावे लागत आहे. तब्बल दहा दिवसांपूर्वी शासनाने वेतनासाठी ६०० कोटी देण्याची घोषणा केली. मात्र, आजपर्यंत वेतन न मिळाल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. वेतनाचे घोडे नेमके कुठे अडले? असा प्रश्न आता कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

कोरोनामुळे एसटीचे उत्पन्न ठप्प झाले आहे. त्यामुळेच शासनाला वेतनासाठी वारंवार निधी द्यावा लागत आहे. परंतु, शासनस्तरावर नियोजन केले जात नसल्याने प्रत्येक महिन्यात वेतनासाठी एसटीला शासनाकडे हात पसरण्याची वेळ येत आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९ जून रोजी एसटीच्या आढावा बैठकीत सहाशे कोटी रुपये देण्याची घोषणा केली.

parivahan
शिवसेनेत बाळासाहेबांचा एकच गट, पक्षात गटबाजी नाही- संजय राऊत

यावेळी मात्र शासनाने मंजूर केलेली रक्कम एसटी महामंडळाकडे वर्ग न झाल्याने अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन झालेले नाही. सहा तारखेला घोषणा झाल्यामुळे पुढील तीन- चार दिवसांत वेतन होईल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती. मात्र, दहा दिवस उलटूनही लालफितीच्या कारभारामुळे वेतन मिळू शकले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

काय आहे परिस्थिती
एसटीच्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने वित्त विभागाने पाठविलेल्या फाईलवर उपमुख्यमंत्री यांची स्वाक्षरी झाली आहे. त्यानंतर अप्पर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक यांच्या स्वाक्षरीनंतरही फाइल वित्त विभागाचे सचिव राजीव कुमार मित्तल यांच्याकडे परत पाठविण्यात आली आहे. त्यानंतर यावर साधारण सोमवारी (ता. २१) शासन निर्णय अपेक्षीत आहे. जर सोमवारी शासन निर्णय झालाच तर ही फाइल कोशागार कार्यालय व पुन्हा परिवहन आयुक्त असा प्रवास करेल, त्यानंतर तर पुढील तीन- चार दिवसांत कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष वेतन मिळेल अशी शक्यता आहे.

parivahan
Unlock: आजपासून आणखी १३ बस रस्त्यावर; 12 मार्गावर होणार ४४४ फेऱ्या

कर्मचारी हतबल
एसटीचे बहुतांश कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात, अनेकांनी विविध कारणांसाठी कर्ज घेतलेले आहे. कर्जाचे हाफ्ते, घरभाडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करावा आणि घर कसे चालवावे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. प्रत्येक महिन्यात वेतनाला उशीर होत असल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत.

इंटकतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्यानेच वेतनासाठी ६०० कोटी मंजूर झाले आहेत. मात्र, लाल फितीत फाइल अडकल्याने प्रत्यक्ष वेतन झाले नाही. कर्मचाऱ्यांच्या हातात वेतन मिळावे, यासाठी मंत्रालयात चकरा मारुन पाठपुरावाही केला असून, सोमवारी शासन निर्णय होऊन मंगळवार, बुधवार पर्यंत वेतन होईल.
मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()