लालपरीचे चाके संपातच रुतलेले! विद्यार्थी सायकलवर गाठतात शाळा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची वाट न पाहता आपले होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सायकलींना पसंती दिली अन् शेकडो विद्यार्थी-विद्यार्थीनी सायकलीद्वारे शाळेत जाऊन शिक्षण आत्मसात करु लागले आहेत.
ST Strike Affects Schools In Aurangabad
ST Strike Affects Schools In Aurangabadesakal
Updated on

पाचोड (जि.औरंगाबाद) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बावीस महिन्यांनंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू होत असतानाच एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू झाला. अन् ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना बाहेरगावच्या शाळेला जाणे दुरापास्त बनले. मात्र पालकांसोबत ज्या विद्यार्थ्याना मनापासुन शिक्षणाची (Education) आवड (Aurangabad) आहे. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) मिटण्याची वाट न पाहता आपले होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सायकलींना पसंती दिली अन् शेकडो विद्यार्थी-विद्यार्थीनी सायकलीद्वारे शाळेत जाऊन शिक्षण आत्मसात करु लागले आहेत. त्यांच्या करिता एसटीपेक्षा सायकलच वेगवान बनल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) (Paithan) परिसरात पाहावयास मिळते. (ST Strike Affects Education System In Paithan Taluka, Students Use Bicycles Aurangabad Updates)

ST Strike Affects Schools In Aurangabad
वडिलांच्या वाढदिवसाला मुलीचे अनोखे भेट, कॅन्सर रुग्णांना केले केस दान

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे चाके अद्यापही थांबलेले असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एसटी संपामुळे विद्या र्थ्यांसह पालकांना त्रास सहन करावा लागतोय. बसेस नसल्याने त्यांना अव्वाच्या सव्वा दर देऊन खासगी प्रवासी वाहनांतून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दररोज शाळेत खासगी वाहनाने पाठवण्याचा खर्च पालकांना परवडत नसल्याने परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न बिकट बनुन शैक्षणिक व्यवस्थाच धोक्यात आली आहे. विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने शाळेत येऊन शिकतात. मात्र विद्यार्थिनींना अनेक मर्यादा असल्याने त्याना एसटी शिवाय शाळेत पाठविण्यास पालकवर्ग धजावत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. शाळेत कसे यायचे अन् कसे शिकायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत येण्यास विद्यार्थ्यांना एसटीशिवाय अन्य साधने उपलब्ध नसल्याने अनेकांना पायपीट करावी लागत आहे, तर काही जण गैरहजर राहत आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी थेरगाव, वडजी, लिबगाव, खादगाव, खंडाळा, माळीवाडी आदी ठिकाणच्या बहुतांश पालकांनी एसटीवर अवलंबुन न राहता त्यास छेद देत सायकलींना पसंती दिली. अन् एसटीपेक्षा सायकलीच 'त्या' विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वेगवान ठरल्यात. मात्र एसटीच्या संपामुळे विद्यार्थ्यांना सायकलीद्वारे शाळेत पोहोचण्यासाठी थंडी, उन, वाऱ्यांत कष्ट सोसावे लागत आहे.

ST Strike Affects Schools In Aurangabad
Aurangabad|रोहयो मंत्री भुमरेंच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन

काही विद्यार्थी एसटीचे रडगाणे न गाता पायपीट करत शाळेत येतात तर काही शाळेला गैरहजर राहणे पसंत करतात. पैठण, पाचोड, औरगाबादजवळील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना खासगी वाहनांच्या माध्यमातून शाळेला जाणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने मुलांचे शैक्षणिक नकसान होत आहे. वेळेवर काहींना वाहन मिळत नसल्याने तर काहींजण सायकलीद्वारे तर काही पायी शाळेत येत असल्याने त्यांना शाळेत पोहोचल्यानंतर थकवा जाणवून त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. अन् अशातच शाळा सुटल्यानंतर चालत घरी जाण्याचा त्यांना खूप कंटाळा येताना दिसतो.

ST Strike Affects Schools In Aurangabad
लाल टोपीला घाबरल्याने उद्घाटनांचा धडका, जया बच्चन यांची मोदींवर टीका

एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थ्यांची शाळा-महाविद्यालयांतील उपस्थिती घटली आहे. खासगी प्रवासी वाहतूक महागली आहे. एसटी कर्मचारी संपावर असल्याने नाइलाजाने विद्यार्थी खासगी वाहनांतून प्रवास करत आहेत. अकरावी, बारावी व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा मोफत पासची सुविधा मिळते. मात्र, बस बंद असल्याने त्यांची ही सुविधा बंद झाली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थिनींचे शिक्षण बंद होण्याच्या मार्गावर आहे. राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाला एसटी बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी पावले उचलावीत.

- सुरेश पाटील, मुख्याध्यापक, त्रिंबकदास पटेल महाविद्यालय, थेरगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.