छत्रपती संभाजीनगर : व्यवस्थापनाने कामावरून कमी केल्याचा राग मनात धरत दोन कामगारांनी व्यवस्थापकावर (मॅनेजर) चाकूने हल्ला करीत जखमी केले. ता.६ रोजी सायंकाळी साडेसात वाजता हा प्रकार भारतनगर भागात घडला. याप्रकरणी दोन्ही कामगारांवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.