Chhatrapati Sambhajinagar : रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार इमरान फायटर आणि त्याच्या साथीदाराला बुलेट चोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. उधार दिलेले पैसे वसूल करण्यासाठी बुलेट चोरीचा सल्ला देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. तसेच चोरीची बुलेट जप्त केली. पडेगाव येथून ही बुलेट चोरण्यात आली असून, छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अब्दुल्ला खान जावेदखान (वय ३१ रा. भारत गॅस गोडाउन, प्रिया कॉलनी, पडेगाव) यांनी तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्यांची बुलेट एक फेब्रुवारीला चोरी गेल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी छावणी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. द
रम्यान, या चोरीमध्ये कुख्यात गुन्हेगार शेख इरफान शेख सरवर (३० रा. शहानूरवाडी, चौसर, उस्मानपुरा) याचा हात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. यावरून पथकाने सापळा रचून आरोपी इरफान शेख आणि त्याचा साथीदार फैसल फरिद कुरेशी (२६ रा. सिल्लेखाना) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीची बुलेट जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त प्रशांत स्वामी, एसीपी धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, प्रकाश डोंगरे, हैदर शेख, धर्मराज गायकवाड, संतोष चौरे यांनी केली.
आरोपी फैसल याचे सिल्लेखाना भागात बिफ शॉप आहे. त्याचे आरोपी इरफानकडे १५ हजार रुपये उधार आहेत. ही रक्कम फैसलला हवी होती. इरफानकडे पैसे नसल्याने तो टाळाटाळ करीत होता. इरफान हा सराईत गुन्हेगार आहे.
इन्स्टाग्रामवर त्याचे इरफान फायटर नावाने अकाउंट असून त्यावर विविध रिल्स आहेत. त्याच्यावर विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. फैसलनेच त्याला अब्दुल्ला खान याची बुलेट चोरता येऊ शकते ही माहिती दिली होती. यावरून इरफानने बुलेट चोरली. ग्राहक शोधत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.