Chh. Sambhaji Nagar : पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर पाणी; एसटीपीच्या फक्त 5 एमएलडी पाण्याला मागणी

शासनाच्या १७० कोटींतून आता होणार ड्रेनेजलाइन
STP plants sewage water treatment plant treat drainage water 70 MLD of water is being treated daily
STP plants sewage water treatment plant treat drainage water 70 MLD of water is being treated daily Sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नक्षत्रवाडी, पडेगाव, झाल्टाफाटा व सलीम अली सरोवरात एसटीपी प्लांट (मल जल प्रक्रिया प्रकल्प) सुरू केले आहेत. यातील नक्षत्रवाडी येथे रोज ७० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात असून, हे पाणी नाल्यात सोडले जाते.

या पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करून ते शुद्ध करण्यासाठी शासनाने महापालिकेला १७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, मात्र शुद्ध झालेल्या (टर्शरी वॉटर) पाण्याला ग्राहकच मिळत नसल्याने हा प्रकल्प बारगळल्यात जमा आहे.

एमआयडीसीने फक्त पाच एमएलडी पाणी घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी मंजूर निधी शहरातील नो-नेटवर्क भागात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी वापरण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी महापालिकेने शासनाकडे केली आहे.

महापालिकेने काही वर्षांपूर्वी भूमिगत गटार योजनेअंतर्गत ४६५ कोटी रुपये खर्च करून मुख्य मलजल निस्सारण व शहराच्या काही भागात अंतर्गत ड्रेनेजलाइन टाकल्या होत्या. तसेच तीन ठिकाणी एसटीपी प्लांट सुरू करण्यात आले.

झाल्टा फाटा येथी एसटीपी प्लांटचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांना दिले जाते, मात्र नक्षत्रवाडी व पडेगाव येथील एसटीपीचे पाणी पुन्हा नाल्यात सोडले जाते. एसटीपीच्या पाण्याचा वापर एमआयडीसी, डीएमआयसीसह शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी करावा, असे आवाहन शासन, महापालिकेतर्फे वारंवार करण्यात आले, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान समृद्धी महामार्गासाठी या पाण्याचा वापर करण्यात आला. एसटीपीचे पाणी आणखी शुद्ध केल्यास पाणी औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांसाठी वापरल्या जाऊ शकते, असे गृहीत धरून शासनाने महापालिकेला १७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

त्यातून नक्षत्रवाडी येथे ३० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारला जाणार होता. मात्र या शुद्ध पाण्याला ग्राहक मिळेल का? याची चाचपणी महापालिकेने केली असता, एमआयडीसीने फक्त पाच एमएलडी पाणी घेण्याची तयारी दर्शविली, मात्र पाइपलाइन महापालिकेला टाकून द्यावी लागेल, अशी अट टाकली.

त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा निधी नो-नेटवर्क भागात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी वापरण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.

शासन आदेशाला मिळेना प्रतिसाद

पुर्नप्रक्रिया केलेले पाण्याचा औद्योगिक क्षेत्रात सांडपाणी म्हणून वापर व्हावा, असे शासनाचे आदेश आहेत. मात्र, कंपन्यांकडून अशा पाण्याला मागणी नाही. महापालिकेतर्फे सध्या फक्त उद्यान विभाग चार टॅंकरव्दारे या पाण्याचा वापर करत आहे.

असे आहेत प्रकल्प

प्रकल्प -क्षमता -सध्या होणारी प्रक्रिया

  • नक्षत्रवाडी -१६१- ७०

  • झाल्टा फाटा- ३५- १०

  • पडेगाव -१० -०५

  • सलीम अली -०५ -बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.