Ghati Hospital : घाटीत रुग्णांसाठी मिळेना स्ट्रेचर

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अपघात विभागात, इतर वॉर्डांत किंवा काही तपासणीसाठी रुग्णांना नेण्याकरिता स्ट्रेचरच उपलब्ध होत नाही.
Ghati Hospital Stretcher
Ghati Hospital Stretchersakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अपघात विभागात, इतर वॉर्डांत किंवा काही तपासणीसाठी रुग्णांना नेण्याकरिता स्ट्रेचरच उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रशासनाने गाजावाजा करून तयार केलेला स्ट्रेचर पॉइंट कागदावरच का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

घाटी रुग्णालयामध्ये रुग्णांना वॉर्डात नेण्यासाठी किंवा काही तपासणी करण्याकरिता न्यावे लागते. यासाठी स्ट्रेचरचा वापर केला जातो. परंतु, अपघात विभागात सध्या रुग्णांना नेण्यासाठी स्ट्रेचरच मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना स्वतः स्ट्रेचर शोधून आणावे लागते. रुग्णाला स्ट्रेचरवर टाकून वॉर्डमध्ये स्वतः नातेवाइकांना घेऊन जावे लागत असल्याचे चित्र दिसते.

विशेष म्हणजे स्ट्रेचरची शोधाशोध करण्यातच नातेवाइकांचा बराच वेळ जातो. घाटी रुग्णालयाने मोठा गाजावाजा करीत मेडिसिन इमारतीसह अपघात विभागातदेखील स्ट्रेचर पॉइंट सुरू करण्याचा दावा केला. परंतु, सद्यःस्थिती पाहता स्ट्रेचर पॉइंट कागदावरच असल्याचे दिसून येते.

साहित्य वाहतुकीसाठी स्ट्रेचरचा वापर

एकीकडे रुग्णांना स्ट्रेचर मिळत नसल्याचे पाहायला मिळते. दुसरीकडे मात्र घाटी परिसरात विविध साहित्यांची वाहतूक करण्यासाठी चक्क स्ट्रेचरचा वापर होत असल्याचे चित्र दिसले. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मेडिसिन इमारतीत अशी अडचण नाही. परंतु, अपघात विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने असा प्रकार जाणवतो. या पॉइंटवर काही कर्मचारी ठेवण्यात आले होते. परंतु, वार्डात मनुष्यबळ कमी पडले की कर्मचारी तिकडे पाठवावे लागतात.

- डॉ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.