Chh. Sambhaji Nagar : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात !

मुख्य मार्गावरील शाळेमुळे रस्ता ओलांडणे अवघड
sambhajinagar
sambhajinagarsakal
Updated on

वाळूज : येथून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर महामार्गावर जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा आहे. या महामार्गावर रोज हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांच्या अंगाचा थरकाप उडतो. त्यांच्या पालकांचाही जीव टांगणीला लागतो. या ठिकाणी अपघात झाल्यास जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जिल्हा परिषदेची वाळूज प्राथमिक केंद्रीय शाळा महामार्गावरच आहे. या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. परिसरातील लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे या शाळेची विद्यार्थी संख्याही वाढत आहे. दरम्यान, शाळा भरताना आणि सुटताना रस्त्यांवर विद्यार्थ्यांची गर्दी होती. याच वेळी वाहनांची सुसाट ये-जा सुरू असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.

sambhajinagar
Chh. Sambhajinagar News : फोन करून महिलांची छेड काढणे भोवले

शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी गेट आहे. त्यामुळे रस्ता अरुंद असल्याने विद्यार्थी बाहेर पडण्यासाठी एकमेकांना लोटालोटी करतात. शाळा सुटल्यावर मात्र शिक्षकांनी गेटवर थांबून विद्यार्थ्यांना शिस्तीत शाळा बाहेर सोडावे. त्यातून कुणीही विद्यार्थी महामार्गावर वावरणार नाही याची काळजी घ्यावी.

- रवींद्र राऊत, पालक लाइननगर

sambhajinagar
Chh. Sambhaji Nagar Tourism : बोटिंगसोबत नववर्षात घ्या मिनी ट्रेनचा आनंद

नाही सूचना फलक, गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग

शाळांसमोरील भागात रस्त्यालगत फलकाद्वारे समोर शाळा आहे, वाहने सावकाश चालवा, अशी सूचना दिलेली असते. एवढ्यावरच न थांबता वाहनांची गती कमी असावी, यासाठी, छोटेखानी स्पिड ब्रेकरही असतो. मात्र, वाळूजची शाळा महानगर भागात त्याचबरोबर नगर-छत्रपतीनगर महामार्गावर असूनही भरधाव येणाऱ्या वाहनधारकांना फलकाद्वारे सूचना तर नाहीच. पण, झेब्रा क्रॉसिंगचाही या ठिकाणी पत्ता नाही.

जिल्हा परिषदेच्या शाळेत गरिबांची मुले शिकण्यास आहेत. त्यात कामगार, कष्टकरी, शेतकरी व मजुरांच्या मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडे सहसा कुणाचे लक्ष जात नाही. या शाळेच्या बाबतीतही हाच प्रकार झाला. मुलांच्या पालकांना कामावर जावेच लागते. तरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत नेऊन सोडण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. अशावेळी शिक्षकांनीच त्यांचे गुरूही व पालकही व्हावे.

- भीमा केदारे, पालक, शनी मंदिर मार्ग, वाळूज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.