Sambhaji Nagar : तलाठी भरती ‘नॉर्मलायजेशन’ प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात

एमपीएससीमार्फतच परीक्षा घ्यापेपरफुटीच्या घटना, वाढीव शुल्क, अचानक केंद्र बदलाच्या प्रकारांनी परीक्षार्थींमध्ये संताप
sambhaji nagar thalati exam
sambhaji nagar thalati examsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : तलाठी भरती परीक्षा प्रक्रियेतील नॉर्मलायजेशनवर आक्षेप आणि भ्रष्ट कारभाराचा आरोप करुन विद्यार्थी रस्त्यावरुन आंदोलन करीत आहेत. मात्र, मोठ्या संख्येने विद्यार्थी जेव्हा परीक्षा देतात, त्यावेळी सामान्यीकरण (नॉर्मलायजेशन) प्रक्रिया राबवावीच लागते, असा दावा टीसीएस संस्थेने केला आहे. दुसरीकडे, परीक्षांसाठी भरमसाठ वाढवलेले शुल्क, पेपर फुटी प्रकरणे आणि एकूणच अनागोंदीवर मात्र संस्थेने आणि सरकरी यंत्रणणेही चुप्पी साधलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात संतापाची लाट कायम आहे.

राज्यभरात झालेली तलाठी परीक्षा सुरवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रा. विठ्ठल कांगणे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. परीक्षेतील सामान्यीकरणानंतर (नॉर्मलायजेशन) अनेक विद्यार्थ्यांचे गुण कमी तर काहींचे अधिक झालेले आहेत. त्यातही ४८ विद्यार्थ्यांना तर २०० पैकी २०० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत! मुळात संशयास्पद असलेल्या टीसीएस आणि आयबीपीएस या दोन्ही संस्था रद्द करुन एमपीएससीमार्फतच घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

काय आहे नार्मलायजेशन?

मोठ्या संख्येने उमेदवार असल्यास परीक्षा वेगवेगळ्या सत्रात घेतली जाते. म्हणजेच एकाच दिवशी सकाळी एक पेपर, दुपारी एक पेपर आणि सायंकाळी एक पेपर घेतला जातो. अशी अनेक दिवस परीक्षा घेतली जाते. याचे उदाहरण म्हणजे, नुकतीच झालेली तलाठी परीक्षा. यासाठी १० लाख ४१ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली.

sambhaji nagar thalati exam
Sambhaji Nagar News : ऑरिकमध्ये ‘अल्ड्रीच’चे पहिले आयटी पार्क,मराठवाड्यातील दोन हजार जणांना मिळणार रोजगार ; मिर्झा बेग

दररोज तीन सत्रात जवळपास १९ दिवस ही परीक्षा घेण्यात आली. एकूण ५७ सत्र झाले म्हणजेच ५७ प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या. निकालाआधी गुणांचे नॉर्मलायजेशन म्हणजेच सामान्यीकरण करण्यात येते, जे सध्या झालेले आहे आणि त्यावरूनच विद्यार्थ्यांच्या मनात खूपच संभ्रम निर्माण झालेला आहे. टीसीएसच्या म्हणण्यानुसार सामान्यीकरण (नॉर्मलायजेशन) ही प्रक्रिया मुळात अत्यंत किचकट आहे. यासाठी फॉर्म्युला ठरविलेला आहे. त्यानुसार हे सामान्यीकरण कसे करण्यात येते? तर एका दिवसात तीन वेगवेगळ्या वेळांत झालेल्या आणि एकूण दिवस झालेल्या पेपरच्या प्रश्नांची काठिण्य पातळी विचारात घेतली जाते.

सोपी प्रश्नपत्रिका आणि कठीण प्रश्नपत्रिका असा फरक विचारात घेतला जातो. हा फरक स्पर्धा परीक्षेचे तज्ज्ञ तपासणी करून ठरवितात. काठिण्य पातळी जास्त असलेल्या पेपरच्या उमेदवारांवर अन्याय होऊ नये म्हणून ही प्रक्रिया केली जाते. कठीण पेपर दिलेल्या आणि सोपा पेपर दिलेल्या उमेदवारांच्या गुणांची सरासरी काढली जाते. त्यासाठी एक गणिती सूत्र वापरले जाते. त्यानुसार परीक्षार्थींच्या गुणांमध्ये बदल होतो. तलाठी परीक्षेत हेच झाले. पेपर बऱ्यापैकी सोपे असल्याने आधीच बहुतांश परीक्षार्थींनी ७० ते ८० टक्क्यांच्यावर मिळाले. त्यात नॉर्मलायजेशननंतर हे गुण अधिक वाढले. काहींना तर पैकीच्यापैकी गुण मिळाले. हीच पद्धत रेल्वे भरती बोर्ड, स्टाफ सिलेक्शन कमीशन, म्हाडा आदी नोकर भरतीत पूर्वी वापरल्याचे टीसीएसचे म्हणणे आहे. याची माहिती WWW.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करा

प्रा. संतोष बोर्डे ः तलाठी भरती निकालानंतर सामान्यीकरणामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर केला पाहिजे. सरळसेवा भरतीची परीक्षा देणारे विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील असतात. भरमसाट शुल्क असल्याने एकाच वेळी अनेक जाहिरातीचे फॉर्म विद्यार्थी भरू शकत नाहीत. परिणामी अभ्यास असूनही ते हतबल असतात. म्हणून सर्वप्रथम शुल्क कमी केले पाहिजे. सातत्याने पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा आता परीक्षांवर विश्वास राहिला नाही. काळाची पाऊले ओळखून सरकारने या बाबींची दखल घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.