Summer Heat : उष्णतेमुळे वाढतोय घामोळ्यांचा त्रास; आरोग्यावर परिणाम

सध्या सर्वत्र उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. या वाढत्या उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत.
Trouble by sweating
Trouble by sweatingsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - सध्या सर्वत्र उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. या वाढत्या उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत. शरीराला थंडावा मिळावा यासाठी फॅन, कूलर आणि एसीची मदत घेतली जात आहे. वातावरणात उष्णता वाढल्याने याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेकांना या दिवसांमध्ये अंगाला खाज सुटते, शरीरावर घामोळ्या येतात.

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना या घामोळ्यांचा त्रास होतो. घामोळ्यांमुळे अंगाची आग होते आणि खाज सुटते.

काहींना जळजळ देखील जाणवते. ज्या लोकांना खूप घाम येतो, अशा लोकांमध्ये ही घामोळ्यांची समस्या जास्त दिसून येते. या घामोळ्यांपासून बचाव करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या क्रीम्स आणि पावडर सहज उपलब्ध होतात. परंतु, जर तुम्हाला यामुळे फरक पडत नसेल तर तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. या घरगुती उपायांमुळे तुमची घामोळ्यांपासून लवकर सुटका होऊ शकते.

थंड पाण्याने करा अंघोळ

उष्माघातापासून आराम मिळवण्यासाठी दिवसातून किमान २ वेळा थंड पाण्याने अंघोळ करा. थंड पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेची रोमछिद्रे उघडण्यास मदत होते, यामुळे उष्णतेपासून आराम मिळतो. उन्हाळ्यात शक्यतो थंड पाण्यानेच अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे, शरीर थंड राहण्यास मदत होते आणि घामोळ्यांपासून आराम मिळू शकतो. या दिवसांमध्ये गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा.

नारळाचे तेल उपयोगी

नारळाचे तेल आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. घामोळ्यांपासून बचाव करण्यासाठी झोपण्यापूर्वी त्वचेवर नारळाचे तेल लावा. या तेलाचा नियमित वापर केल्याने उष्माघातापासून आराम मिळू शकेल. या तेलात आढळणारे घटक त्वचेची जळजळ आणि खाज सुटण्यापासून आराम देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com