छत्रपती संभाजीनगर: प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ३ हजार ६५३ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला. या लाभार्थींनी त्यांच्या घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरवात केली.
सूर्यघर योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॉट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते.
शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॉटपर्यंत मिळते. ३ किलोवॉटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॉट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते.
३ किलोवॉटपेक्षा मोठ्या सिस्टमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरिता इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॉट अनुदान मिळते.
गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॉट आहे. महावितरणतर्फे रूफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सीजसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे.
त्याचप्रमाणे १० किलोवॉटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते.
सूर्यघर योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेऊन पर्यावरणपूरक वीजनिर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करावी. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध आहे.
- पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण छत्रपती संभाजीनगर परिमंडल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.