Sambhaji Nagar Crime : अनैतिक संबंधातून निलंबित कॉन्स्टेबलच्या पतीने काढला उद्याेजक सचिन नरोडेचा काटा

साजापूर येथील लघुउद्योजक सचिन नरोडे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर शहर पोलिसांना यश आले आहे. महिला पोलिसासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून संशयित आरोपी पती पोलिस कॉन्स्टेबलनेच मित्राच्या मदतीने नरोडे यांच्या डोक्यात गोळी झाडत खून केला. १७ मार्चला रात्री साजापूर येथे हा प्रकार घडला होता.
Sambhaji Nagar Crime
Sambhaji Nagar Crime sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : साजापूर येथील लघुउद्योजक सचिन नरोडे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर शहर पोलिसांना यश आले आहे. महिला पोलिसासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून संशयित आरोपी पती पोलिस कॉन्स्टेबलनेच मित्राच्या मदतीने नरोडे यांच्या डोक्यात गोळी झाडत खून केला. १७ मार्चला रात्री साजापूर येथे हा प्रकार घडला होता. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, या खुनासाठी आरोपीने मध्यप्रदेशातून ७० हजारांत पिस्टल खरेदी केले होते.

साजापूर येथील क्रांतीनगर भागात लघुउद्योजक सचिन नरोडे यांची मारेकऱ्यांनी १७ मार्चला रात्री डोक्यात गोळी झाडून हत्या केली होती. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. लघुउद्योजकाची हत्या झाल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. गुन्हे शाखा आणि वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याची आठ पथके पाच दिवसांपासून तपास करीत होती. \

नरोडे यांचे आर्थिक व्यव्हार, महिला पोलिसासोबत असलेले सबंध आणि नंतर आलेले वितुष्ट तसेच विविध बाजुंनी तपास सुरु होता. तपासामध्ये मृत नरोडे यांचे महिला पोलिसाशी असलेल्या संबंधावर पोलिसांनी तपासात लक्ष केंद्रीत केले होते. संशयावरुन पोलिसांनी सुरुवातीपासून रामेश्वर सीताराम काळे (वय ३५, रा. लाडगाव रोड, वैजापूर) याला उचलले होते. सखोल चौकशीनंतर काळे याने आपला साथीदार लक्ष्मण नामदेव जगताप (वय २४, रा. भग्गाव, वैजापूर) याच्या मदतीने नरोडे याचा काटा काढल्याची कबुली दिली. या प्रकरणी रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.

ही कारवाई पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त नितीन बगाटे, उपायुक्त प्रशांत स्वामी, एसीपी धनंजय पाटील, महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, कृष्णा शिंदे, सुधीर वाघ, विनायक शेळके, काशीनाथ महांडुळे, विशाल बोडखे आणि प्रवीण वाघ तसेच पथकाने केली. दरम्यान, या पथकाला पोलिस आयुक्तांनी तपासाबद्दल एक लाख रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

नरोडेंची रेकी

रामेश्वर काळे ग्रामीण पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. २०२३ मध्ये त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यापासून तो निलंबित आहे. नरोडे यांचे आपल्या पत्नीसोबत संबंध असल्याची माहिती काळेला समजली होती. या कारणामुळे त्यांच्यात अनेक वेळा वादही झाले होते. यातून काळे याने नरोडेंचा काटा काढण्याचे ठरवले होते. तीन महिन्यांपासून तो नरोडे यांच्या हालचालींची रेकी करीत होता.

Sambhaji Nagar Crime
Crime News : प्रेयसीला भेटण्यास आलेल्या तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू; पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

१७ मार्चला तो दिवसभर नरोडेंच्या पाळतीवर होता. रात्री नेमका वीज पुरवठादेखील खंडीत झाला होता. ही संधी साधत काळे नरोडेंच्या जवळ आला. नरोडे घरासमोर खड्डे खोदण्याचे काम करीत होते. शेजारील व्यक्तीला नरोडेंनी फावडे आणण्यासाठी पाठवले, अवघ्या काही क्षणाची संधी साधत जवळच असलेला काळे हा नरोडेंच्या जवळ आला. खाली वाकलेला नरोडेच आहे का, हे तपासण्यासाठी त्याने ‘सचिन’ असा आवाज दिला. नरोडे यांनी मागे वळून पाहताच अगदी खांद्यावरून त्याने गोळी नरोडेच्या डोक्यात झाडत अंधारात पलायन केले. या नंतर काळे दुचाकीवर साथीदार जगतापसह वैजापूरला निघून गेला.

मदतीच्या ओझ्यापायी जगतापने केली मदत

आरोपी रामेश्वर काळे आणि लक्ष्मण जगताप यांचा गोपालनाचा व्यवसाय सोबत सुरू होता. जगताप हा आर्थिक अडचणींमुळे विवंचनेत होता. काळे याने सोसायटीचे कर्ज काढत त्याला दीड लाख रुपयांची कर्ज फेडण्यासाठी मदत केली होती. त्याचे उपकार जगतापवर होते. या उपकारापोटी तो काळेला या गुन्‍ह्यात मदत करण्यासाठी तयार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

‘एमपी’तून ७० हजारांत खरेदी केले होते पिस्टल

आरोपी रामेश्वर काळे याने ज्या पिस्टलमधून गोळी झाडली ते पिस्टल त्याने ७० हजार रुपयांमध्ये मध्यप्रदेश येथून खरेदी केले होते. स्वतः कॉन्स्टेबल असल्याने त्याला फायरींगचे ज्ञान होते. त्यामुळे त्याने अगदी झिरो रेंजवरुन नरोडेवर फायरींग केले. या बुलेटची कॅप पोलिसांना सापडली असून ती ७.६ डायमीटरची असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. हे पिस्टलदेखील पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()