Rayat: ‘रयत’मध्ये पाच महिन्यांपूर्वी निवड होऊनही नियुक्ती न मिळाल्याने बालकांना घेऊन भावी शिक्षकांचा रस्त्यावर मुक्काम
शिक्षण आयुक्त कार्यालयाचे उंबरठे झिजविले, मंत्री, नवनियुक्त खासदारांनाही निवेदने देऊन झाली, मात्र मार्गच निघत नसल्याने अखेर राज्यभरातील २०० पेक्षा जास्त शिक्षकांनी आज सकाळपासून पुण्यात शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
teachers on streets with children not been appointed in Rayat despite being selected educationsakal
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात पवित्र पोर्टलमधून ११ हजार ८५ उमेदवारांची रयत शिक्षण संस्थेच्या शाळांत विनामुलाखत निवड झाली खरी, मात्र मागील चार ते पाच महिन्यांपासून न्यायालयीन प्रकरणाचे कारण समोर करत या भावी शिक्षकांना ‘रयत’ने रुजू करून घेतलेच नाही.