BRS : भाजपसह महाविकास आघाडीला फटका बसणार? KCR मैदानात! टार्गेट 'मराठवाडा'

K Chandrasekhar Rao
K Chandrasekhar Rao
Updated on

छत्रपती संभाजीनगर : 'अब की बार किसान सरकार'चा नारा देत भारत राष्ट्र समिती (BRS) पक्ष महाराष्ट्रात दाखल झाला आहे. या पक्षाच्या जाहीर सभेचे आयोजन आज (24 एप्रिल) छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.

बीड बायपास रोडवरील जबिंदा मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेची जोरदार तयारी सुरू असून सभेच्या नियोजनासाठी पक्षाचे नेते, निरीक्षक, खासदार, आमदार शहरात तळ ठोकून आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पक्षाला पुढे नेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याची सुरुवात त्यांनी नांदेड येथून केली होती. नांदेडमध्ये अनेक स्थानिक नेत्यांना सामावून घेतल्यानंतर आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

मराठवाडा केंद्रबिंदू

या जाहीर सभेत जिल्ह्यातील अनेक स्थानिक नेते आणि शेतकरी नेते सहभागी होणार असल्याने राज्याच्या राजकारणात प्रवेश करताना बीआरएससाठी मराठवाडा हा केंद्रबिंदू ठरणार आहे.

मराठवाड्याचे राजकारण बदलेल

जाहीर सभेच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या जाहीर सभेचा विक्रम बीआरएस मोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेनंतर राज्यातील राजकारण नक्कीच बदलणार आहे. (Latest Marathi News)

जाहीर सभेच्या अनुषंगाने पक्षाने मोबाईल स्क्रीनिंग वाहनाद्वारे मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये कृषी क्षेत्राला मोफत आणि दर्जेदार वीज, शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन प्रकल्पांची उभारणी, पेन्शन या सरकारी योजनांचा समावेश आहे. दरम्यान, विविध पक्षांच्या नेत्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे.

K Chandrasekhar Rao
Amol Kolhe : पुस्तकावरील पोस्टमुळे झालेल्या चर्चेला अमोल कोल्हेंचं उत्तर; म्हणाले, 'त्या' विचारधारेचा...

के. चंद्रशेखर राव थेट कामांची पावती जनतेसमोर ठेवत आहेत. आधीचे राज्यकर्ते सभेत आश्वासन देतात. मात्र केसीआर तेलंगणामध्ये केल्या कामांचा पाढा जनतेसमोर मांडत आहेत.

याचा भाजपसह महाविकास आघाडीला देखील मोठा बसणार आहे. थेट सत्ता मिळणार नसली महाराष्ट्रात आपले अस्तित्व निर्माण करण्यात केसीआर यशस्वी होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

K Chandrasekhar Rao
Sambhaji nagar : ‘BRS’च्या सभेमुळे वाहतुकीत बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.