Sambhaji Nagar News : विकास आराखड्यात आपल्या मनातले शहर

रस्त्यांचे जाळे, पर्यटन झोन, बसथांब्यांची नागरिकांची अपेक्षा
sambhaji nagar
sambhaji nagar
Updated on

छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक नागरिकाला आपल्या शहराविषयी आत्मीयता असते. शहराच्या विकासाबद्दल त्याची मते आणि स्वप्नेही असतात. त्यासाठी महापालिकेने वाट करुन दिली आणि विकास आराखड्याला लोकाभिमुख आकार देण्यासाठी पाऊल उचलले. नागरिकांसोबतच उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि आपल्या मनातलं शहर आराखड्यात उतरविण्यासाठी भरभरून सूचना केल्या. निमित्त होते स्मार्ट सिटी कार्यालयात मंगळवारी महापालिकेच्यावतीने आयोजित चर्चासत्राचे.

शहराच्या एकत्रित विकास आराखड्याचे काम अडीच वर्षांपासून सुरू आहे. जुन्या डीपी युनिटने ईएलयू (विद्यमान जमीन वापर नकाशा) तयार केला होता. प्रस्तावित जमीन वापर नकाशाचे (पीएलयू) काम केले जात आहे. पीएलयूमधून शहरवासीयांच्या अपेक्षा काय? हे जाणून घेण्यासाठी विविध घटकांसोबत चर्चा केली जात आहे. त्यानुसार महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी चर्चासत्र घेण्यात आले.

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : मंगळसूत्र चोराला ठोकल्या बेड्या

पार्किंग विकसित करण्याची व्यापारी महासंघाची तयारी

व्यापारी महासंघाचे लक्ष्मीनारायण राठी यांनी बाजारपेठेच्या ठिकाणी पार्किंगची सुविधा असावी, अशी मागणी केली. महासंघ पार्किंगच्या काही जागा बीओटीवर विकसित करण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.

कोण काय म्हणाले...

जी. श्रीकांत (प्रशासक) : पीएलयू जाहीर केल्यावर सूचना, हरकतीची संधी दिली जाईल, पण सुरवातीलाच शहराच्या गरजा लक्षात घेऊन पीएलयु तयार केला तर हरकती, सूचना कमी येतील, त्यामुळे ही बैठक घेतली. यातील सूचनांचा सकारात्मक विचार करू.ए. बी. देशमुख (शहर अभियंता) : जालना रोड, बीड बायपास रस्ता, सोलापुर-धुळे महामार्ग, आमदार रस्ता हे रस्ते पूर्व-पश्चिम रस्ते आहेत, त्यांची संख्या देखील चांगली आहे. दक्षिणोत्तर रस्त्यांची शहराला गरज आहे. त्यासाठी विकास आराखडा तयार करताना आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे. स्मशानभूमी, ठराविक अंतरावर बसथांबे आणि स्वच्छतागृह याचा समावेश देखील त्यात असावा.

मुकुंद भोगले (सीएसएन फर्स्टचे अध्यक्ष) ः शहराचे पर्यटन व औद्योगिकदृष्ट्या महत्त्व आहे. येत्या काळात औद्योगीकरण होईल. त्याचा देखील विचार विकास आराखडा करताना प्रशासनाने करावा. पर्यटन झोन तयार करावा, ट्रांझीट कॉरिडॉर तयार करावा, ऐतिहासिक वास्तूंची नोंद घेण्यात यावी.

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : कॉफी कॅफेंवर पोलिसांचे छापे

कचरू वेळंजकर (व्यापारी प्रतिनिधी) ः शहरातील शहागंज, चेलीपुरा या बाजारपेठेच्या भागात मोठे रस्ते, इतर सुविधा नाहीत. त्या देण्यासाठी महापालिकेने प्राधान्याने प्रयत्न केले पाहिजेत. विकास चौधरी (क्रेडाई) ः रिंगरोडचे नियोजन केले पाहिजे, रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, पार्किंग झोन, सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी विकास आराखड्यात तरतूद असावी. (डॉ. उत्तम काळवणे, हरिसिंग यांनी आपली मते व्यक्त केली. अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी कचरा व्यवस्थापनासाठी विकास आराखड्यात जागा सोडण्याची सूचना केली.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.