औरंगाबाद : तारीख १२ डिसेंबर. वेळ साधारण दुपारी सव्वा ते एक वाजेची. ठिकाण होते. जैतखेड्याचा (ता.कन्नड) डोंगर परिसर. जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा भर दुपारी ओढ्या वगळीतून धूळ उडवत मुलचंद पवार या शेतकऱ्याच्या शेतात पाहणीसाठी पोहोचला खरा, मात्र प्रत्यक्ष ठिकाणी जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बरेच अंतर चालत जावे लागले. दरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर रस्त्यांच्या अडचणी मांडताच उपस्थित तहसीलदारांना यांना ‘हा रस्ता माझ्या आठवणीतला रस्ता असणार आहे. त्यामुळे हा रस्ता झालाच पाहिजे’ असे सांगत रस्ता करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
त्याचे झाले असे की, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जैतखेड्यातील निवृत्त नायब तहसीलदार मुलचंद पवार यांनी शेतीत केलेले नवनवीन बदल, तसेच परभणी कृषी विद्यापीठाच्या बदनापूर कृषी संशोधन केंद्र निर्मित बीडीएन ७११ तूर पीक पाहण्यासाठी प्रत्यक्ष रविवारी शेतावर भेट दिली. शेततळे, सीताफळ लागवड, तुरीचे बहारदार पीक आदींची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. श्री.चव्हाण यांनी शास्त्रज्ञ पवार यांच्याकडून बीडीएन ७११ तुरीचे वाण, कालावधी, काढणीपश्चात तंत्रज्ञान, हेक्टरी उत्पादन आदी बाबी समजून घेतल्या.
यावेळी फळतज्ज्ञ मोहन पाटील, पुरवठा अधिकारी वामनराव कदम, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. सु. बा. पवार, रामेश्वर ठोंबरे, खुलताबाद तहसीलदार देशमुख, कन्नडचे तहसीलदार संजय वारकड, बाजारसावंगी मंडळ अधिकारी श्री. जोशी, श्री. भदाने यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
काय म्हणाले जिल्हाधिकारी?
शेतकऱ्यांच्या वतीने सरपंच मुलगा मिथील चव्हाण यांनी कन्नडच्या सीमेपासून दरेगावला जाणारा दोन ते अडीच किलोमीटरचा रस्ता न झाल्याची समस्या मांडली. डोंगर परिसरातील शेतावर पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर रस्त्याचे गाऱ्हाणे शेतकऱ्यांनी मांडताच जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित तहसीलदारांना रस्ता तयार करण्यासंदर्भात सूचना करत ‘मी इथे आलो म्हणजे या रस्त्याचा वेगळा अहवाल, ऑडिट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका, आधी या रस्त्याचे काम निकाली काढा’ असे म्हणत ‘हा रस्ता माझ्या आठवणीतला रस्ता असणार आहे, त्यामुळे हा रस्ता आधी करा’ अशा सक्त सूचना तहसीलदार यांना रविवारी (त.१२) केल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्काळ निर्णयामुळे उपस्थित शेतकरीही हरखून गेले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.