नियमांनुसारच करा नववर्षाचे स्वागत

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली टास्क फोर्सची बैठक, लसीकरणासाठी हर स्कूल, कॉलेज दस्तक मोहिम
The corona rules Do it Welcome Happy New Year
The corona rules Do it Welcome Happy New Yearsakal
Updated on

औरंगाबाद : ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणावर भर द्या. दुसरा डोस घेणे बाकी असणाऱ्यांचे घरोघरी जाऊन लसीकरण (Vaccination) केले जाणार आहे. तसेच नववर्षाचे स्वागत (Welcome Happy New Year) करताना हॉटेलांमधून एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्के मर्यादेचे आणि पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र न येण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे, असे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी सांगितले.

The corona rules Do it Welcome Happy New Year
ऑस्ट्रेलियात ओमिक्रॉनचा पहिला बळी

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.२७) कोविड टास्क फोर्सची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा आदी उपस्थित होते. बैठकीत श्री. चव्हाण यांनी दुसऱ्या डोसचे नियोजन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. ६० वर्षावरील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याबरोबरच १५ वर्षावरील मुलांच्या लसीकरणासाठी तसेच आरोग्य सेवेतील कर्मचारी (फ्रंटवर्कर) यांच्या ०३ जानेवारीपासून २०२२ सुरू होणाऱ्या लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले.

The corona rules Do it Welcome Happy New Year
देशाचे ऐक्य धोक्यात, तुम्ही दखल घ्या

जिल्ह्यात ३ जानेवारीपासून १५ वर्षे पूर्ण झालेल्या मूलांचे लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासनाने करावे. यामध्ये ‘हर घर दस्तक’ प्रमाणेच ‘हर स्कूल-कॉलेज दस्तक’ या उपक्रमांतून मूलांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी आरोग्य व शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठीचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश श्री.चव्हाण यांनी दिले.

सव्वा तीनशे वाहनधारकांना नोटीसा

शहरात विना मास्क फिरणाऱ्या एकूण ३२५ वाहनधारकांना परिवहन विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या असून १ हजार १८० विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांचे फोटो महानगरपालिकेकडून कारवाईसाठी परिवहन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. ह्या वाहन धारकाच्या वाहनांच हस्तांतरणही बंद करण्यात आले आहे.

The corona rules Do it Welcome Happy New Year
मुंबई : विरोधकांचा गृह विभागावर हल्लाबोल

हॉटेलची वेळ नेहमीप्रमाणे मात्र संख्येवर निर्बंध

नववर्षाचा जल्लोष साजरा करताना ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने नागरिकांनी गर्दी टाळावी. हॉटेल व रेस्टारंट येथे आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीचे आणि पाच लोक एकत्र न बसण्याच्या नियमाचे पालन करावे लागेल. तसेच लग्न समारंभ येथे बंदिस्त सभागृहात १०० तर खुल्या मैदानात २५० व्यक्ती उपस्थित राहू शकतील. यासंदर्भात शनिवारी (ता. २५) टास्क फोर्सने घेतलेल्या निर्णयानुसार नियमावली लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महोत्सव स्थगित

ओमीक्रॉनचे संकट निवळेपर्यंत महोत्सव, गर्दी होणारे कार्यक्रम पुढे ढकलण्यात येतील. संयोजकांना गर्दी होणारे कार्यक्रम स्थगित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अजंता महोत्सवही पुढे ढकलण्यात आल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.