Sambhaji Nagar : जिल्ह्याला मिळणार ९६४ नवे शिक्षक

भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डीएड आणि बीएड् धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
sambhaji nagar
sambhaji nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या ९६४ जागा भरण्यात येणार आहेत. गुरुवारपासून (ता. २८) शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डीएड आणि बीएड् धारकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

शिक्षण खात्याने आणखी २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रत्येक संस्थेने बिंदू नामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील यापूर्वी समायोजित झालेले ज्येष्ठ शिक्षक समायोजनातून पूर्ववत ठिकाणी आणले जात आहेत. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत जाहिरात देऊन भरती सुरू केली जाणार आहे

sambhaji nagar
Sambhaji Nagar News : गुरुजींच्या देयकांचा प्रश्‍न अखेर मार्गी

जाहिरात देऊन भरती सुरू केली जाणार आहे. जाहिरात निघाली, की पात्र विद्यार्थ्यांना चॉइस दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. मागील काही दिवसांपासून राज्यात १३,५०० शिक्षकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अनुदानास पात्र शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाने शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

तरीही राहणार रिक्त पदे...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये ८४७ तर उर्दू माध्यमात ११७ अशा एकूण ९६४ जागा विविध प्रवर्गाच्या भरण्यात येणार आहेत. परंतु, शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतरही अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गाचे व गणित विषयाचे उमेदवार न मिळाल्याने शिक्षकांची काही पदे रिक्त राहण्याची शक्यता आहेत.

बिंदूनामावली नुसार जिल्ह्यातील रिक्त पदे

((मराठी माध्यम)))

अनुसूचित जाती ; २२२

अनुसूचित जमाती ; १४८

भटक्या जमाती ब ; ७

विमुक्त जमाती अ ; १

इतर मागासवर्गीय ; २९०

विशेष मागासवर्गीय ; ८

एकूण ; ८४७

((उर्दू माध्यम))

अनुसूचित जाती ; २४

विमुक्त जाती अ ; ७

भटक्या जमाती ब ; ७

भटक्या जमाती क ; १५

भटक्या जमाती ड ; ८

इतर मागासवर्गीय ; ४७

विशेष मागासवर्गीय

एकूण ; ११७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.