Parbhani News : परभणीत अतिक्रमणांनी गाठला कळस

शहरासह राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमणे वाढल्याने नागरिक वैतागले
parbhani
parbhani sakal
Updated on

परभणी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील दोनही बाजूंचे सर्व्हिस रोड, साईडपट्टे अतिक्रमणधारांनी अक्षरशः गिळंकृत केले आहेत. या रस्त्यावर सामुहिकरित्या अतिक्रमणे होऊ लागली आहेत. त्याकडे संबंधीत यंत्रणेने अर्थपूर्ण अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत.

शहरातून जिंतूर व वसमत या राष्ट्रीय महामार्गावर हजारोच्या संख्येने स्थायी, अस्थायी अतिक्रमणांनी रस्त्यांच्या दुतर्फो असलेले साईडपट्टे, सर्व्हिस रोड अक्षरशः गिळंकृत केले आहेत. विसावा फाटा ते खानापूर फाटा व पुढे दत्तधाम - वरद मंगल कार्यालयापर्यंत एक सामुहिक अतिक्रमणांची साखळी झाली आहे. दररोज यात वाढ होत आहे. सरकारी, निमसरकारी कार्यालयाच्या संरक्षक भिंती अतिक्रमणधारकांच्या निशान्यावर असल्याचे चित्र दिसते. यामुळे रहदारीला प्रचंड अडथळ निर्माण होत आहे. शहराचे विद्रुपीकरण झपाट्याने होऊ लागले आहे.

parbhani
Parbhani News : धावत्या कारने घेतला पेट

महानगरपालिकेने उत्पन्न वाढवण्यासाठी मालमत्ताकरासह अन्य करांमध्ये प्रचंड वाढ केली. महानगरपालिकेच्या रस्त्यावरील रिकाम्या जागांसाठी मिळू शकणाऱ्या उत्पन्नाकडे कानाडोळा केला आहे. या अतिक्रमणांना पालिकेतील संबंधीत प्रभाग समित्यांतील काही कर्मचाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा होत असली तरी, पालिका प्रसासनाने देखील अद्यापही याबाबत काहीही धोरणात्मक निर्णय घेऊन या अतिक्रमणधारकांचा आपले उत्पन्न वाढीसाठी उपयोग करुन घेतला नाही.

त्यामुळे नागरिकांना मात्र त्रिस्तरीय अतिक्रमण धारकांचा सामना करावा लागतो. या मार्गावर अनेक प्रतिष्ठाणे आहेत. व्यवसाय रस्त्यावरच मांडले आहेत. त्याही पुढे स्थायी अतिक्रमणधारक आहेत. हातगाड्यांची अतिक्रमणे असून या अतिक्रमणांना नागरिक अक्षरशः वैतागले आहेत.

parbhani
Parbhani News : वाहतूक होणार गतिमान

सरकारी जागेची भाडेवसुली

या रस्त्यावरील सरकारी, खासगी कार्यालये, शाळांसह विविध आस्थापना, घरांच्या संरक्षण भिंती अतिक्रमणधारकांसाठी सोयीच्या ठरल्या आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा या अतिक्रमणधारकांकडून काही फायदा होतो की नाही, हे माहित नाही. परंतू याबाबत प्रमुखांना देखील काही आक्षेप असल्याचे दिसून येत नाही. तसेच या रस्त्यावरील काही आस्थापनाचालक आपल्यापुढे असलेल्या अतिक्रमणधारकांकडून पालिकेच्या जागांचा किराया वसूल करत असल्यामुळे अतिक्रमणांना संरक्षण दिल्या जात असल्याचे चित्र आहे. जिंतुर रस्त्यावर गणपती चौकात विद्युत मंडळ कार्यालयाच्या संरक्षक भिंतीला तर आता नव्यानेच सामुहिक अतिक्रमणे होऊ लागली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.