Sambhaji Nagar News : तब्बल सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण वेदनामुक्त

घाटीच्या डाॅक्टरांचे यश : डाव्या पायाची मुख्य रक्तवाहिनी होती बंद
sambhaji nagar
sambhaji nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : हृदयापासून पायापर्यंत रक्त पुरवठा करणारी मुख्य रक्तवाहिनी बंद (ब्लॉक) झाली होती. त्यामुळे सुदर्शन काळे वय ४० (नाव बदललेले आहे) यांचा पाय खूप दुखत होता. पायाला मुंग्या येत होत्या. अक्षरशः पाय निकामी होण्याची वेळ आली होती. परंतु, घाटीतील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारत सात तास शस्त्रक्रिया करून रुग्णाला वेदनेतून मुक्त केले.

विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी तब्बल साडेतीन लाख रुपये खर्च आला असता. परंतु, घाटीत ही शस्त्रक्रिया मोफत झाली. हृदयापासून पायापर्यंत रक्त पुरवठा करणारी फेमोरल व पोपलीटीएल आर्टरी नावाची मुख्य रक्तवाहिनी असते. सुदर्शन यांची ही रक्तवाहिनी बंद झाली होती. त्यामुळे त्यांचा पाय खूप दुखत होता. पायाला मुंग्या येत होत्या.

sambhaji nagar
Chhatrapati Sambhaji Nagar : शाळा वाचवण्यासाठी करणार राज्यभर आंदोलन; शिक्षक भारतीच्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात सूर

ती रक्तवाहिनी बायपास करून तळपायापासून हृदयाकडे रक्त घेऊन जाणारी ग्रेट सॅफनस व्हेन (रक्तवाहिनी ) टाकली आहे. सहा डिसेंबरला ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेला आणखी पंधरा दिवस उशीर झाला असता तर त्यांचा पाय निकामी झाला असता, असे डॉक्टरांनी सांगितले. ही शस्त्रक्रिया घाटीचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॅा. सुधीर चौधरी, अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, विभाग प्रमुख डॉ. आशिष भिवापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सदानंद पटवारी, डॉ. हुसेन शेख यांनी केली.

sambhaji nagar
Sambhaji nagar News : रस्त्यांसाठी हवेत एक हजार कोटी

निकोटीन सेवनाने आजारांच्या रुग्णात वाढ

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या पेरिफेरल आर्टरी डिसीज या आजाराचे रुग्ण वाढत आहे. तंबाखू, सिगारेट, बिडी अशा निकोटीन असणाऱ्या पदार्थांच्या सेवनाने शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक होत असल्याचा प्रकार रुग्णांमध्ये दिसून येत आहे. कार्डिओ व्हस्कूलर ॲण्ड थोरॅसिक सर्जरी (सी.व्ही.टी.एस.) विभागाच्या ओपीडीत महिन्याला १२० रुग्ण तपासले जातात. यातील ३० टक्के रुग्णांमध्ये या आजाराचे निदान होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.