Donkey Milk : गाढविणीच्या दुधाबाबत अभ्यासकांत दोन मतप्रवाह

काही म्हणतात औषधी, तर काहींच्या मते दाव्याला शास्त्रीय आधार नाही
Donkey Milk
Donkey Milksakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर/धाराशिव : गाढविणीचे दूध विशिष्ट आजाराला उपायकारक आहे, असे म्हटले जाते. मात्र यास आजपर्यंत तरी कुठेही शास्त्रीय आधार नाही. मात्र, ग्रामीण लोकधारणेमुळे याबाबत बरेच समज लोकांत आहेत.

पशुसंवर्धन आणि वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यावर अद्याप तसे कोणतेही संशोधन नाही. दुसरीकडे हे दूध औषधी म्हणून वापरतात, सौंदर्यप्रसाधनसाठीही वापरतात, असे एका आयर्वेद डॉक्टरांचे आणि गाढवावर काम केलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

यामुळे याबाबत दोन मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे. तथापि, हे दूध औषधी असल्याचे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. गाढविणीचे दूध हे तसे खूप कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने त्याची किमंत प्रचंड आहे, यावर सर्वांचेच एकमत होते.

याच्या औषधी म्हणून वापराला कुठेही शास्त्रीय आधार नाही, असे येथील पशुसंवर्धन उपायुक्त गौरीशंकर हुलसुरे, धाराशिव जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश हरिदास आणि आयुर्वेदचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. गंगासागरे यांचे म्हणणे आहे.

मात्र, दुसऱ्या बाजूला काही ग्रंथांत याबद्दल नोंदी असल्याचे आणि त्याचा उपयोग सौंदर्यप्रसाधनासाठीही होत असल्याचे डॉ. राजेश पवार आणि प्रा. डॉ. गंगाप्रकाश चन्ना यांनी सांगितले. यापूर्वी इमू पक्षी आणि कडकनाथ कोंबडीच्या मांस आणि अंड्याबद्दल अशाच धारणा लोकांमध्ये प्रसृत झाल्या होत्या.

कालांतराने लोकांमध्ये जसजशी याबाबत समज येत गेली, तेव्हा त्या समजाला आळा बसला आहे. पूर्वी हजारो रुपये खर्चून घ्यावे लागणारे इमू पक्ष्याचे मांस आणि अंडे काही रुपये देऊनही कोणी घेत नसल्याचे चित्र आहे.

अशाच समजामुळे जर्सी गायीचे दूध किंवा क्रॉस ब्रिडिंग पाळीव प्राण्यांचे दूध आयुष्यभर न पिणारेही काही लोक आहेत. त्याच पद्धतीने हे लोकसमज रूढ झालेले आहेत. मात्र, त्याला कसलाही शास्त्रीय आधार नाही,

असा युक्तिवाद डॉ. हुलसुरे करतात. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनीही गाढविणीचे दूध आजार बरा करण्यास उपयुक्त आहे, यास कुठलाही शास्त्रीय आधार आजपर्यंत समोर आला नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. एस. गंगासागरे यांनीही असेच सांगितले.

Donkey Milk
Chh. Sambhaji Nagar : संपूर्ण राज्यात लालपरीची संख्या वाढवावी

दुसऱ्या बाजूला अष्टांग हृदय आणि चरक संहितेत याच्या नोंदी आहेत. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ राजीव दीक्षित यांच्या पुस्तकातही गाय, घोडा, हत्ती, मनुष्य, गाढव यांच्या दुधांबद्दल नोंद आहे. ते चवीला आंबट आहे. वात कमी करते, झटक्यावर उपयोग होतो. लहान मुलांना होणाऱ्या गुहाबाधेवर, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणाऱ्या मुडदूस आजारावर ते वापरतात, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

हे दूध औषधासाठी लोक वापरतात. बऱ्याच औषधी कंपन्या याचा वापर करतात. सौंदर्यप्रसाधनातही याचा वापर करतात. एक गाढविण जास्तीत जास्त पाऊण लिटर दूध देते. त्याला देशात आणि परदेशातही मागणी असते. यामुळे त्याला किंमत आहे. मी गाढवावर अभ्यास केला आहे. विदर्भात गाढवांचा फार्मही आहे, अशी माहिती उदगीर (जि. लातूर) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. चन्ना यांनी दिली आहे.

Donkey Milk
Chhatrapati Sambhajinagar : अवकाळीने शेतीमाल जमा करताना शेतकऱ्यांची दमछाक

पुणे, मुंबईतील तज्ज्ञांचीही मते या निमित्ताने जाणून घेतली असता त्यांनीही याला कोणताही शास्त्रोक्त आधार नसल्याचेच सांगितले. पुण्याच्या कात्रज डेअरीचे विवेक क्षीरसागर यांनी यावर तसे कोणतेही संशोधन नसल्याचे स्पष्ट केले. तर मुंबईच पशुसंवर्धन विभागातील उपायुक्त शैलेश केंडे यांनी सांगितले की, प्रत्येक प्राण्याच्या दुधाला संपूर्ण आहाराचा दर्जा दिलेला आहे. त्या अर्थाने गाढविणीच्या दुधाबाबत म्हणता येईल, मात्र त्यावर संशोधन अद्याप वाचण्यात आलेले नाही.

गाढविणीच्या दुधाचे मुळात प्रचंड शॉर्टेज असते. त्यामुळे ज्याची उपलब्धता कमी त्याची किंमत जास्त हा सिद्धांत इथे लागू पडतो. ५८ लाख जनावरे दूध देतात. पण प्रश्न उपलब्धतेचा असतो. गायीचे दूध सहज उपलब्ध होते म्हणून त्याची किंमत जास्त नाही. गाढविणीचे उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्याचा दर प्रचंड आहे. औषधी असल्याचा शास्त्रोक्त आधार मात्र तपासावा लागेल.

- शैलेश केंडे, उपायुक्त, पशुसंवर्धन, मुंबई

गाढविणीच्या दुधाच्या औषधी परिणामांबाबत माझ्या वाचण्यात अद्याप काही आलेले नाही. चर्चा मात्र खूप आहे. एकदा ते उपयुक्त आहे अशी चर्चा झाली की वाढतच जाते. मुळात संशोधकांवर ही जबाबदारी आहे की, त्यांनी याचा अभ्यास करून ठाम मत मांडायला हवे. ते अत्यंत कमी प्रमाणात मिळत असल्याने अतिशय महाग मात्र आहे.

- विवेक क्षीरसागर, माजी कार्यकारी संचालक, कात्रज डेअरी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.