Sambhaji Nagar News : अभ्यागताच्या बैठकीला मनपाचा प्रतिनिधी नाही

संतप्त डॉ. मंडलेचा यांचे अधिष्ठातांना पत्र
sambhaji nagar
sambhaji nagarsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अभ्यागत समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत, यापूर्वीच्या बैठकीतही आपल्याला अपमानास्पद वागणूक देण्यात आली, असा आरोप महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केला. यामुळे यापुढील बैठकीला महापालिका आरोग्य विभागाचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पत्रात नमूद केले की, ‘घाटीत दोन महिन्यातून एकदा अभ्यागत समितीची बैठक होते. बैठकीला घाटीचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह अभ्यागत समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि विभाग प्रमुखांची उपस्थिती असते. नुकतीच ही बैठक पार पडली. या बैठकीत तसेच यापूर्वीच्या बैठकीतही सर्व सन्माननीय सदस्यांच्या नावानिशी आसन व्यवस्था करण्यात आली होती.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : उपचार सोडून वृद्धेची दागिने शोधासाठी पायपीट

परंतु, मला शेवटच्या रांगेत बसविण्यात आले. यासह चहा-पाणीसुद्धा जाणून-बुजून विचारले जात नाही. महापालिकेचा प्रतिनिधी म्हणून या बैठकीला मला आमंत्रित करण्यात येते. असे असतानाही देण्यात आलेली ही वागणूक अपमानास्पद असून, कार्यालयीन शिष्टाचाराचा भंग करणारी आहे. यापुढे होणाऱ्या अभ्यागत समितीच्या बैठकीला महापालिका आरोग्य विभागाकडून कुठलाही प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही’, असे पत्रात नमूद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.