Pachod Police : मारुती मंदिरात पूजेचा बहाणा केला अन् पुजारी महिलेच्या गळ्यातील सोन्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला

अकराशे रुपये दक्षिणा तुम्हाला देतो असं सांगून चोरट्यांनी पूजा संपल्यानंतर महिलेची दिड तोळे सोन्याच्या पोतवर डल्ला मारला.
Maruti Temple Sansthan Pachod Police
Maruti Temple Sansthan Pachod Policeesakal
Updated on
Summary

या मार्गावरील दोन-तीन ठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात सदरील चोरटे कैद झाले असून या आधारे पाचोड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

आडुळ : भरदिवसा मंदिरात पुजारी असलेल्या महिलेला आम्हाला देव पूजा करायची आहे. मात्र, आमच्याकडे सोनं नाही, त्यामुळे पूजा करेपर्यंत तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत (Gold Necklace) द्या. पूजा संपली की, सोनं व अकराशे रुपये दक्षिणा तुम्हाला देतो असं सांगून चोरट्यांनी पूजा संपल्यानंतर सदरील महिलेची दिड तोळे सोन्याच्या पोतवर डल्ला मारीत दुचाकीवरुन पोबारा केल्याची घटना आडुळ (ता. पैठण) येथे घडली.

याबाबत पाचोड पोलिसांनी (Pachod Police) दिलेल्या माहितीनुसार, आडुळ (ता. पैठण) येथील मारुती मंदिर संस्थान (Maruti Temple Sansthan) येथे रुख्मनबाई बबनराव परेश व त्यांचे कुटुंबीय पुजारी म्हणून कार्यरत आहेत. आज रुख्मनबाई परेश या एकट्याच मंदिरात होत्या, त्यावेळी दुपारी एक वाजेच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती तिथे आले व त्यांना म्हणाले, आम्हाला मारुतीची पूजा करायची असून आम्ही फूल व दक्षिणा आणली आहे. मात्र, आमच्याकडे सोनं नाही तेव्हा तुम्ही आमची पूजा करेपर्यंत तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत या अकराशे रुपये (दक्षिणा) व फुलावर ठेवा.

Maruti Temple Sansthan Pachod Police
Car Accident : दुचाकीवरून औषध आणण्यासाठी जाणाऱ्या सख्ख्या बहि‍णींवर काळाचा घाला; कारच्या धडकेत दोघी ठार, भाऊही जखमी

म्हणजे, आमची पूजा पुर्ण होईल. त्यानंतर तुमची पोत व दक्षिणा तुम्ही घेवून टाका असे सांगितल्याने रुख्मनबाई यांनी त्यांच्या गळ्यातील पोत पूजेच्या फुलावर ठेवली. याच संधीचा फायदा घेत या अज्ञात दोन्ही भामट्यांनी तिथे पूजेसाठी ठेवलेली पोत घेऊन मंदिरातून धूम ठोकली. ही बाब रुख्मनबाई यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला.

मात्र, तो पर्यंत चोरट्यांनी दुचाकीवर बसून पोबारा केला. रस्त्यावरील दोन-तीन ठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात सदरील चोरटे कैद झाले असून या आधारे पाचोड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर, बीट जमादार जगन्नाथ उबाडे करीत आहेत.

Maruti Temple Sansthan Pachod Police
Ambegaon News : शाळेला सुट्टी असल्यामुळे गावी आलेल्या विद्यार्थ्यांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी अंत; शेतमजूर कुटुंबात शोककळा

दरम्यान, संध्याकाळी पैठण तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर भोरे, पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, बीट जमादार जगन्नाथ उबाळे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व भोरे यांनी तपासासंदर्भात सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.