औरंगाबाद : राज्यातील तीन विमानतळांचे लवकरच नामकरण केले जाणार असून, बदल करण्यात येणाऱ्या विमानतळांमध्ये औरंगबाद, शिर्डी आणि कोल्हापूर विमानतळांचा समावेश असणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. औरंगाबाद विमानतळाचे (Aurangabad Airport) नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याच्या मागणीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला असून, त्याबाबत अद्यापपर्यंत निर्णय झाला नसल्याचे कराड म्हणाले. (Three Airports In The State Renamed Soon)
लवकरच औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज, शिर्डीच्या (Shirdi Airport) विमानतळाला साईबाबा आणि कोल्हापूरच्या (Kolhapur) विमानतळाचे महालक्ष्मी विमानतळ असे नामकरण लवकरच केले जाणार आहे, असे कराड म्हणाले. औरंगाबाद, शिर्डी, कोल्हापूरसह देशातील 13 विमानतळांचे नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे. येत्या कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे कराड यांनी यावेळी स्पष्ट केले.
औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील दोन वर्षांपूर्वी विधानसभेत केली होती. त्यानंतर आता औरंगाबाद, शिर्डी, कोल्हापूरसह देशातील 13 विमानतळांचे नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे असून, येत्या कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे कराड यांनी यावेळी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.