बायोडिझेलचा काळाबाजार, तिघा जणांना अटक

तिघ जणांना अटक
तिघ जणांना अटक
Updated on

औरंगाबाद : बायोडिझेलचा काळाबाजार (Biodiesel Black Marketing) करणाऱ्या तिघांना सिडको पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई शनिवारी (ता. २८) जळगाव रोडवरील कलावती मंगल कार्यालयाजवळ करण्यात आली. सलमान इस्माईल खान (रा. सेंट्रल नाका), टेरेन्स विलियम लोबो (रा. पन्नालाल नगर) आणि समशेर मेहबुब पठाण (रा. संजय नगर, बायजीपुरा) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी (Crime In Aurangabad) त्यांच्या ताब्यातून अडीच हजार लिटर बायोडिझेल, टेम्पो, पंप असा ५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जळगाव रोडवरील कलावती मंगल कार्यालयाजवळ काही जण अवैध बायोडिझेलचा साठा करीत असल्याची गोपनीय माहिती सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पुरवठा निरीक्षक कविता गिरणे यांना यांच्यासह सिडको पोलिसांच्या पथकाने छापा मारला.

तिघ जणांना अटक
घरी अभ्यासाला गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेडछाड

यावेळी सलमान खान, टेरेन्स लोबो आणि समशेर पठाण हे तिघे टेम्पोमध्ये बायोडिझेल विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करत असल्याचे आढळून आले. तिघांनी २०० लिटर प्रतिक्षमतेचे २०० ड्रममध्ये बायोडिझेल साठा केल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारवाईत टॅम्पो, मोटर पंप, असा ५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करत सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संभाजी पवार, विनोद सलगरकर, सहायक पोलिस निरीक्षक अवघड, पोलिस नाईक संतोष मुदीराज, विजयानंद गवळी, इरफान खान, सिध्दार्थ नवतुरे, गणेश नागरे, शाम काळे, शिनगारे, बिल्लारी, देशमुख, तडवी, पगारे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()