औरंगाबाद : शेततळ्यात पोहोण्याचा मोह जीवाशी, तिघांचा मृत्यू

बजाजनगर येथील तिन्ही मुले फिरायला म्हणून घरून निघाले होते.
Three Boys Drowned In Farm Pond In Aurangabad
Three Boys Drowned In Farm Pond In Aurangabadesakal
Updated on

वाळूज (जि.औरंगाबाद) : शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शरणापूर येथून जवळ असलेल्या भांगसी माता गड परिसरात सोमवारी (ता.२१) उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने मृत मुलांना पाण्याबाहेर काढले.

वाळूज परिसरातील सारा संगम सोसायटी बजाजनगर येथील प्रतिक आनंद भिसे (वय १५), तिरुपती मारुती कुदळकर (वय १७) व शिवराज संजय पवार (वय १६) हे तीन जण बजाजनगर येथून रविवारी (ता.वीस) दुपारी दीडच्या सुमारास भांगसी माता गडाकडे सायकल वरून फिरण्यासाठी गेले होते. गडाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शरणापूर गट न ८/४ मधील नारायण वाघमारे यांच्या शेकापूर शिवार शेतातील शेततळ्यात पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही.(Three Boys Drowned In Farm Ponds In Bajajnagar Area Of Aurangabad)

Three Boys Drowned In Farm Pond In Aurangabad
Osmanabad जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा पराभव, महाविकास आघाडीचे वर्चस्व

त्यामुळे तिघेही मुले त्या शेततळ्यातील पाण्यात उतरले. मात्र प्लास्टिक पेपर अंथरलेला असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. व ते पाण्यात बुडाले. सोमवारी (ता.२१) गुराखी गुरे चारत असताना त्यांना तळ्याजवळ दोन सायकली दिसल्या व शेततळ्याच्या काठावर कपडे व चप्पला पडलेल्या आढळल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले.

मात्र त्यांना कुणीही दिसले नाही. त्यावेळी त्यांना हे मुले तलावात बुडल्याचा संशय आला व त्यांनी तात्काळ दौलताबाद पोलिसांना संपर्क साधला. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठत अग्निशमन दलाच्या मदतीने शेततळ्यात शोध घेऊन त्या तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटीत पाठवले.

Three Boys Drowned In Farm Pond In Aurangabad
Aurangabad | औरंगाबादेत स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, ६ महिला ताब्यात

दरम्यान बजाजनगर येथील हे मुले रविवारी दुपारी फिरायला म्हणून घरून निघाले होते. ते रात्री घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ता असल्याची नोंद करून त्यांचा शोधाशोध सुरू केली होती. परंतु ते तिघेही मृत आढळल्याने यावेळी त्यांनी एकच हंबरडा फोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.