औरंगाबाद : पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बुधवारी (ता.२६) शहरात रात्री फेरफटका मारला. त्यांच्याबरोबर यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय होते. साधारण त्यांनी रात्री १२ ते दीड वाजेपर्यंत हा फेरफटका मारला. या प्रसंगी ठाकरे यांनी पर्यटनस्थळे व विकासकामांची पाहणी करुन सोयी-सुविधांचा आढावा घेतला आहे. बुधवारी त्यांच्या हस्ते स्मार्ट सिटी काॅर्पोरेशनने सुरु केलेल्या ई-गव्हर्नन्स, जीआयएस व नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. (Tourist And Environment Minister Aaditya Thackeray Toured Aurangabad At Late Night)
नागरिकांच्या सुरक्षेकरिता चिखलठाणा आठवडा बाजार ते जिजाऊ चौकापर्यंत लावण्यात आलेल्या पर्यावरणपूरक एलईडी पथदिव्यांचे लोकार्पणही करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी आढावा बैठकही घेतली. औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सध्या राज्याच्या मंत्र्यांचे दौरे वाढले आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अगोदर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. त्यांनी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.