औरंगाबाद : वाहतूक नियम पाळा, नसता गुपचूप दंड भरा

पोलिसांशी वाद टाळा अन्यथा संघर्ष अटळ : मोटार वाहन (सुधारणा) अधिनियमात नियमांना महत्त्व
traffic rules Follow Secretly pay the fine
traffic rules Follow Secretly pay the fine sakal
Updated on

औरंगाबाद : राज्यात शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम लागू केला आहे. यात वाहतूक नियमांना अधिक महत्त्व दिलेले आहे. वाहतूक नियमांचा (traffic rules) भंग करू नये, म्हणूनच जबर दंड आणि वाहन परवाना निलंबन अशा तरतुदी आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी आता वाहतूक नियमांचे पालन करण्यावर भर द्यावा लागणार आहे. एक तर नियम(rules) पाळा, अन्यथा निमूटपणे दंड भरा. पोलिसांशी वाद टाळा अन्यथा संघर्ष अटळ आहे, हेही लक्षात घ्या अशीच सध्याची परिस्थिती आहे.

traffic rules Follow Secretly pay the fine
नागपूर : महिलांसाठी पुरेशी प्रसाधनगृहेही नाहीत

केंद्र शासनाने सन २०१९ मध्ये मोटर वाहन (सुधारणा) अधिनियम लागू केलेला आहे. जबर दंडाची तरतूद असल्याने संघर्ष नको म्हणून अनेक राज्यांनी हा लागू केला नाही. महाराष्ट्राने केला नव्हता, मात्र आता दोन वर्षानंतर हा कायदा राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता नागरिकांनाच नियम पाळण्याची सवय करून घेण्याचीच गरज आहे. वाहतूक चलन (दंड) बऱ्याच प्रमाणात वाढवला आहे. हा दंड सामान्य नागरिकांना भरणे अशक्य आहे. परंतु नियम पाळणे शक्य आहे. जबर दंडामुळे नागरिक आणि पोलिस यांच्यामध्ये वाद वाढत आहे. मात्र, हा दंड सरकारच्या धोरणामुळे वाढलेला आहे. दंड पोलिसांनी वाढवला नाही हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे.

traffic rules Follow Secretly pay the fine
नांदेड : अतिवृष्टीमुळे वाढला कर्जाचा बोजा

तर हे नक्की करा..

  • वाहन परवाना नसेल तर सर्वप्रथम काढून घ्या, अन्यथा वाहन चालवू नका

  • दुचाकीवर हेल्मेट घाला, शक्यतो पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट घालायला सांगा

  • वाहनाची कागदपत्रे तसेच वाहन परवाना सोबत बाळगा

  • वाहनाचा इन्शुरन्स अद्ययावत ठेवा, संपला तर पुन्हा लगेच अपडेट करा.

  • वाहन शकतो दुसऱ्याला देऊ नका, दिलेच तर त्याच्या वाहन परवान्याची खात्री करा.

  • आपल्या दुचाकीवर तिसरा व्यक्ती बसवू नका

  • आपले वाहन विकले तर ते वाहन घेणाऱ्याने त्याच्या नावावर केले किंवा नाही हे पहा, अन्यथा ऑनलाइन दंड तुम्हाला भरावा लागेल हे लक्षात ठेवा

  • मुलगा वाहन सज्ञान होईपर्यंत त्याला वाहन चालवण्यास देऊच नका, अन्यथा पस्तावण्याची वेळ येईल.

  • वाहन चालवताना सिग्नल तोडू नका, सिग्नलच्या कॅमेरामुळे वाहनावर सीसीटीव्ही कॅमेरा मार्फत दंड पडतो, आणि तो तुमच्या घरपोच येतो.

  • सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवू नका, स्टॉपलाईन ओलांडू नका

  • लाल सिग्नल लागताना वेग वाढवू नका, उलट पिवळा सिग्नल लागताच वेग कमी करून वाहन थांबवा

  • जवळचा रस्ता पडेल म्हणून उलट्या दिशेने (रॉंगसाईड) वाहन चालवू नका.

  • चारचाकी चालवताना नेहमी सीट बेल्ट चा वापर करा

  • नंबर प्लेट फॅन्सी किंवा तुटलेली असेल तर ती बदलून टाका,

  • व्यवस्थित मोठ्या अक्षरात नंबर दिसेल अशी नंबर प्लेट लावा.

  • खासगी वाहनांवर पोलिस, प्रेस, ॲडव्होकेट किंवा इतर काही मजकूर लिहू नका.

  • वाहनाला दोन्ही बाजूला आरसे आवश्यक आहे.

"वाहनांसाठी नवीन नियमातील जबर दंड सामान्यांना परवडणारा नाही. मात्र, प्रत्येकाला वाहतूक नियमाचे पालन करता येणे शक्य आहे. जबर दंड भरावयाचा नसेल तर वाहतूक नियमांचे पालन करण्याची सवय लावून घेतली पाहिजे."

- सुरेश वानखेडे (सहाय्यक पोलिस आयुक्त, वाहतूक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()