छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर येथील तीन तर मराठवाड्यातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्हा व उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील १३ तर मराठवाड्यातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांची परभणी येथे तर उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांची हिंगोली आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त डॉ. भारत कदम यांची लातूर येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदल्या केल्या आहेत.
याशिवाय धाराशिव येथील महेंद्रकुमार कांबळे यांची बीडला जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली केली आहे. धाराशिवचे राजकुमार माने यांची नांदेडला, नांदेडचे संदीप कुलकर्णी धाराशिवला उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदल्या केल्या आहेत.
डॉ. कदम यांची सहा महिन्यांतच बदली
विभागीय आयुक्तालयातील मागासवर्ग कक्षाचे सहायक आयुक्त डॉ. भारत कदम यांची अवघ्या सहा महिन्यात बदली करण्यात आली आहे. डॉ. कदम यांची मे २०२३ मध्ये लातूर येथे सारथीमध्ये बदली केली होती. त्यानंतर त्यांची बदली रद्द करत जुलै २०२३ मध्ये मागास वर्ग कक्षाचे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. सहायक आयुक्त म्हणून रुजू होऊन केवळ सहा महिन्यातच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.