वाळूज : कोईमतूर येथून छत्रपती संभाजीनगरला पोच करण्यासाठी दिलेली सहा क्विंटल इलायची आणि कपडे, असा एकूण १४ लाख ६३ हजार रुपयांचा माल ट्रकचालकाने लंपास केला. याप्रकरणी ट्रान्स्पोर्ट मालकाच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांत गुन्हा नोंदवून चालकासह दोघांना अटक झाली.
ओमकार विजयकुमार ढगे (रा. वडगाव, ता. लातूर) आणि गजानन बाबूराव केंद्रे (रा. वडगाव, हल्ली रा. पंढरपूर, जि. लातूर) अशी त्यांची नावे आहेत. पुणे जिल्ह्याच्या ससेवाडी येथील ट्रान्स्पोर्ट कंपनीच्यावतीने भाडेतत्त्वावर मालाच्या वाहतुकीसाठी ट्रक पुरविल्या जातात. या पद्धतीने ता. ५ ऑक्टोबरला कोईमतूर येथून ट्रान्स्पोर्टच्या ट्रकमध्ये (एमएच १२, एसएफ ७५२४) १४ लाख ६३ हजार ९२४ रुपये किमतीचा माल भरण्यात आला.
त्यात इलायची आणि अंतर्वस्त्रे, असा लाखो रुपयांचा माल होता. तो माल छत्रपती संभाजीनगरकडे नेला जात असताना तो संबंधित ट्रकमध्ये भरल्यानंतर सीलबंद करण्यात आला होता.
मात्र, कोईमतूर ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान ट्रकचालक ओमकार ढगे व त्याचा सहकारी गजानन केंद्रे यांनी ट्रकचे सील तोडून काही माल लंपास केला. ही घटना ता. ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान घडली. याप्रकरणी ट्रान्स्पोर्ट कंपनीचे चैतन्य प्रकाश वाडकर (वय ३८, रा. पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक अजय शितोळे तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.