भरधाव ट्रक घुसला हॉटेलात! औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील घटना

 औरंगाबाद -सोलापूर  महामार्गावर अंबड फाट्याजवळ भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घुसून उलटली. (छायाचित्र : हबीबखान पठाण, पाचोड)
औरंगाबाद -सोलापूर महामार्गावर अंबड फाट्याजवळ भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घुसून उलटली. (छायाचित्र : हबीबखान पठाण, पाचोड)
Updated on
Summary

हॉटेलमध्ये पाच सहा ग्राहकांसह स्वतः जावेद होते. आपल्या दिशेने ट्रक येत असल्याचे पाहून त्यांनी हाॅटेलबाहेर पळ काढला.

पाचोड (जि.औरंगाबाद) : रस्ता ओलांडताना (Aurangabad) भरधाव वेगातील मालवाहू ट्रक हॉटेलमध्ये घुसून झालेल्या अपघातात हॉटेल चालकाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Aurangabad-Solapur Highway) शनिवारी (ता.पाच) पाचोडजवळ (ता.पैठण) (Paithan) अंबड फाट्यानजीक घडली. अधिक माहीती अशी, अंबडकडून मालवाहू ट्रक (एमएच १६ ए ई ०६१०) मका घेवून भरधाव वेगात पाचोडमार्गे नगरकडे जात असताना अंबड (Ambad) फाट्याजवळ औरंगाबाद-सोलापूर महामार्ग ओलांडत असताना वाहनचालकाला वेगावर नियंत्रण मिळविता न आल्याने हा ट्रक सरळ रस्त्यालगत असलेल्या येथील शेख जावेद यांच्या हॉटेलमध्ये घुसले. हॉटेलमध्ये पाच सहा ग्राहकांसह स्वतः जावेद होते. आपल्या दिशेने ट्रक येत असल्याचे पाहून त्यांनी हाॅटेलबाहेर पळ काढला. ट्रक खुर्च्या, अँगलला धडकून उलटला. यात अनेक खुर्च्या अँगल, छत मोडले, रस्त्यावर ट्रकमधील धान्याचे पोते सर्वत्र विखुरले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Truck Suddenly Move Into Hotel At Solapur Aurangabad Highway)

 औरंगाबाद -सोलापूर  महामार्गावर अंबड फाट्याजवळ भरधाव ट्रक हॉटेलमध्ये घुसून उलटली. (छायाचित्र : हबीबखान पठाण, पाचोड)
मराठ्यांना वाऱ्यावर सोडू नका, विनायक मेटेंचा सरकारला इशारा

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळाहून वाहन सोडून जखमींच्या मदतीविना पसार झाले. पाचोड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी व जमादार सुधाकर मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. औरंगाबाद-सोलापूर महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही अपघाताची मालिका सुरुच असल्याने रस्त्यावरील ब्लॅकस्पॉट (अपघात प्रर्वषण ठिकाण) कडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने वळणे सरळ करण्यासह महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधकाकडे दुर्लक्ष केल्याचा जनतेतून आरोप केला जात आहे. या महामार्गाच्या रूंदीकरणाप्रसंगी रस्त्यावरील सर्व वळणे सरळ करण्याचे नियोजन होते. मात्र बहुतांश वळणे सरळ करण्याकडे कानाडोळा झाल्याने अपघाताचे प्रमाण कमी होऊन निष्पाप प्राण वाचण्याची अपेक्षा काही अंशी फोल ठरली असून गावाजवळ भुयारी मार्ग, पादचारी मार्ग, गतिरोधक बसविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कैलास भांड यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.