धक्कादायक! सुट्टीत मावशीकडे आलेल्या दोन सख्ख्या भावांचा तळ्यात बुडून मृत्यू

स्वप्नील हा नववीत तर, साहिल आठवीत शिकत होता. दोघे भाऊ उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मावशीकडे आले होते.
Aurangabad Latest News
Aurangabad Latest Newssakal
Updated on

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : औरंगाबादच्या गारखेडा परिसरातील सूतगिरणी येथील रहिवाशी असलेले दोन सख्खे भाऊ उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मावशीच्या घरी आले होते. सोमवारी (ता.३०) पाचपीरवाडी (ता. गंगापूर) शिवारातील शेतामध्ये असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असताना दोघांचाही बुडून मृत्यू झाला. स्वप्नील संतोष काळे (वय १५), सोहिल संतोष काळे (वय १३) अशी दुर्दैवी मृत भावंडाची नावे आहेत. औरंगाबाद (Aurangabad) शहरातील गारखेडा परिसरातील सूतगिरणी परिसरातील इयत्ता नववीत शिकणारा स्वप्नील काळे व आठवीत शिकणारा साहिल काळे हे दोन्ही सख्खे भाऊ उन्हाळ्याची सुट्टी असल्याने त्यांचे काका संजय नरवडे यांच्याकडे सुट्टी घालवण्यासाठी आलेले होते. (Two Brothers Drowned In Farm Pond In Pachpirwadi Of Aurangabad)

Aurangabad Latest News
MPSC | सहायक कक्ष अधिकारी स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर

दरम्यान शेतातील कामासाठी काका व मावशी हे शेतात असताना पोहता येत असलेला मावसभाऊ व हे दोन्ही भाऊ पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले होते. स्वप्नील व साहिल या दोन्ही भावंडाना पोहता येत नसल्याने ते दोघे शेततळ्यात असलेली ठिबकची नळी धरून पोहत असतानाच अचानक ठिबकची नळी तुटली अन् दोघे भाऊ पाण्यात बुडू लागले. मावसभावाने त्यांना बुडताना बघितले आणि घाबरून जोराने ओरडला परंतु जवळपास कोणी नसल्याने त्याचा आवाज कोणीही ऐकला नाही. दरम्यान स्वप्नील व सोहिल या दोन्ही दुर्दैवी भावंडचा बुडून मृत्यू झाला. शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदशनाखाली अंमलदार संतोष पवार, पोलीस मित्र बाबा शेख यांनीही तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पोलीस पाटील उधलसिंग जारवाल राजपूत यांच्या सहकार्याने या दोन्ही भावांना लासूर स्टेशन (Lasur Station) येथील प्राथमिक आरोग्या केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Aurangabad Latest News
Aurangabad | डिझेलच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंपावर रांगा, नागरिकांची पळापळ

घटनेने सर्वत्र हळहळ

औरंगाबादच्या गारखेड्यातील सूतगिरणी परिसरात राहणाऱ्या या दोन्ही भावांचे वडील संतोष भगवान काळे हे कामगार आहेत. दोन्ही मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने कालच मावशीकडे पाचपीरवाडी (ता. गंगापूर ) येथे आणून सोडले होते. शेततळ्यात पोहता येत नसताना ठिबकच्या नळीच्या भरवशावर धरून पोहताना नळी तुटली अन् दोघे बुडाले. आता त्यांची आईवडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()