औरंगाबादेत कारचा भीषण अपघात; दोन जण ठार, ४ गंभीर

अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा पुर्णतः चुराडा झाला.
Aurangabad Accident News
Aurangabad Accident Newsesakal
Updated on

पाचोड (जि.औरंगाबाद) : पैठणकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने ट्रॅक्टरमागे असलेल्या कार चालकानेही अचानक ब्रेक लावले. तोच भरधाव वेगात पाठीमागून येणारी कारसमोरील कारवर धडकून झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोड-पैठण रस्त्यावर लिंबगाव (ता.पैठण) फाट्याजवळ बुधवारी (ता.२३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ठार झालेल्यांची नावे अनिल बाबासाहेब कोरडे व दत्ता निवृत्ती तांगडे (दोघे रा. दावरवाडी,ता.पैठण) असे आहे. (Two Died, Four Serious Injured In Accident In Aurangabad)

Aurangabad Accident News
अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत सेवानिवृत्त शिक्षक जागीच ठार

अधिक माहिती अशी, पैठण येथील राहूल माळवदे व त्यांचा मुलगा साई माळवदे हे कारन (एमएच २० सीएस ७४२०) पाचोडकडून पैठणकडे जात असताना त्यांच्या पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने अचानक ट्रॅक्टरला ब्रेक लावल्याने माळवदे यांनी आपली कार ब्रेक केली. मात्र त्यांच्या कारमागे भरधाव वेगात येणारी कार (एमएच २० बीवाय.९१९३) चालकाला समोरील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न आल्याने व अचानक वेगावर नियंत्रण करणे अशक्य झाल्याने समोरील कारला या कारने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे या कारमधील अनिल बाबासाहेब कोरडे व दत्ता निवृत्ती तांगडे हे दोघे जण जागीच ठार झाले, तर लतीब तांबोळी, सोमिनाथ दहीभाते यांच्यासह दोघे जणं गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा पुर्णतः चुराडा झाला झाला. या अपघाताप्रसंगी पैठणकडे (Paithan) पाचोड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक फेरोझ बरडे व त्यांचे सहकारी जात होते.

Aurangabad Accident News
मेहुण्यावर ईडीच्या छाप्यानंतर मातोश्रीचे दरवाजे हलतायत, भाजपची ठाकरेंवर टीका

त्यांनी थांबून पाचोड पोलिसोना माहिती दिली. तसेच अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक नागरिकांसह परिसरातील शेकडो नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील गर्दी व वाहतुकीचा खोळंबा लक्षात घेऊन पाचोड पोलिस ठाण्यांचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, विलास काकडे, प्रशांत नांदवे, रविद्र आंबेकर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतुक सुरळीत केली व ग्रामस्थांच्या मदतीने सर्वांना पाचोड येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर घुगे यांनी उपरोक्त दोघास तपासून मृत घोषित केले, तर चौघांवर प्रथोमोपचार करून त्यांना औरंगाबाद (Aurangabad) येथील शासकीय वैद्यकिय रूग्णालयात (घाटी) पाठविले. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यांत नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()