Sambhajinagar : शहरातील दोन घटनांमध्ये सोनसाखळी पळवली ; ज्येष्ठ महिलेला धक्का देत चोरटा पसार

विविध दोन घटनांत एका ज्येष्ठ महिलेसह सामाजिक कार्यकर्ता महिलेची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी हिसकावत पळ काढला. या घटना समर्थनगर आणि मुकुंदवाडी परिसरात घडल्या.
Sambhajinagar
Sambhajinagar sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : विविध दोन घटनांत एका ज्येष्ठ महिलेसह सामाजिक कार्यकर्ता महिलेची सोनसाखळी दुचाकीस्वारांनी हिसकावत पळ काढला. या घटना समर्थनगर आणि मुकुंदवाडी परिसरात घडल्या. समर्थनगर येथील घटनेत चोरट्याने ज्येष्ठ महिलेला धक्का दिल्याने त्या खाली कोसळून जखमी झाल्या. या दोन्ही प्रकरणांत क्रांती चौक आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद झाले.

पहिली घटना समर्थनगर भागात शुक्रवारी (ता. १६) रात्री सव्वानऊ वाजता घडली. या ठिकाणी ७५ वर्षीय महिला घराबाहेर फिरत होती. यावेळी भगवा शर्ट व पांढऱ्या रंगाची पँट घातलेला तरुण त्यांच्या जवळ आला. या तरुणाने महिलेला धक्का देत त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅमची सोनसाखळी हिसकावली. ही महिला ओरडत असताना चोरटा पसार झाला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पीएसआय शेवाळे तपास करीत आहेत.

दुसरी घटना रविवारी (ता. १८) दुपारी तीन वाजता मुकुंदवाडी परिसरात घडली. या घटनेतील महिला लहान मुलासह मोपेडवरून घरी जात होती. यावेळी स्पोर्ट बाइकवर दोन अनोळखी तरुण त्यांच्या जवळ आले. या तरुणांनी महिलेच्या गळ्यातील ६५ हजारांची सोनसाखळी हिसकावून पळ काढला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.