औरंगाबाद : गंगापूर फाट्यावर अपघात, दोन तरुण जागीच ठार

औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गंगापूर फाट्याजवळ ट्रक मोटरसायकल अपघातात दोन वर्गमित्र जागीच ठार झाल्याची घटना घडली.
accident
accidentsakal
Updated on
Summary

औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गंगापूर फाट्याजवळ ट्रक मोटरसायकल अपघातात दोन वर्गमित्र जागीच ठार झाल्याची घटना घडली.

गंगापूर (जि. औरंगाबाद) - औरंगाबाद-पुणे महामार्गावरील गंगापूर फाट्याजवळ ट्रक मोटरसायकल अपघातात दोन वर्गमित्र जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. तीन) सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे.

आदीत्य रामनाथ सुंब (वय : २०) रा. मांजरी व यश नयन शेंगुळे (वय : २०) रा. जयसिंग नगर गंगापूर असे ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य व यश हे दोघे मित्र औरंगाबाद शहरातील एका खासगी शिकवणी वर्गात दुचाकीवर (एम. एच २० ईएक्स. ६०४८) जात असताना गंगापूर फाट्यावर गंगापूर फाट्याजवळ नाशिक येथुन हैद्राबादला जाणारा रस्त्यावरच उभ्या असलेल्या ट्रकला (के. ए. ५६ ४१२३) जाऊन धडकून दोघांचाही म्र्युत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस राहुल वडमारे, डॉ. प्रशांत पंडूरे, सचिन सुरासे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिकेत चालक सागर शेजवळ व नागरिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवुन अपघातग्रस्त ट्रक बसस्थानक आवारात नेवुन लावला या घटनेमुळे गंगापूर व मांजरी गावात शोककळा पसरली आहे. घटनेने येथील रुग्णालय परिसरात मोठी गर्दी जमली होती.

वडील गेले अन मुलगाही

आदित्य सुंब हा जिल्हा परिषदेचे शिक्षक रामनाथ सुंब यांचा एकुलता एक मुलगा होता. मागील वर्षी कोरोनात रामनाथ सुंब यांचे वडील बाबासाहेब सुंब यांचा म्र्युत्यू झाला होता. आधी वडील आणि नंतर मुलगा गेल्याने शिक्षक रामनाथ सुंब यांच्यावर व नयन शेंगुळे यांना एक मुलगा व एक मुलगी होती. एकुलता एक मुलगा गेल्याने दोन्ही कुटुंबावर दुखाचे आभाळ कोसळले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.