Umarga Crime : मद्यधुंद अवस्थेत शहरात दहशत माजवत 25 वाहनांच्या काचा फोडणाऱ्या दोन तरुणांना अटक

नुकसान झालेल्या वाहनमालकांनी तक्रार दिल्याने या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता.
Umarga Crime News
Umarga Crime Newsesakal
Updated on
Summary

पोलिसांनी सोमवारी (ता.२०) रात्री राबविण्यात आलेल्या कोबिंग ऑपरेशनमध्ये साहिल पोलिसांच्या हाती लागला. साहिल हा ट्रक चालक आहे.

उमरगा (जि. धाराशिव) : उमरगा शहरात शनिवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास अनोळखी व्यक्तींकडून जवळपास २० ते २५ वाहनांच्या काचा फोडण्यात आल्यानंतर शहरात वेगळ्या अर्थाने चर्चा सुरु होती. पोलिसांनी (Umarga Police) वाहनांसह काही घरांवरही दगडफेक करुन दशहत निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन सोमवारी (ता. २०) रात्री दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या.

या बाबतची माहिती अशी की, शनिवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास अचानक काही अनोळखी व्यक्तींकडून आदर्श विद्यालय (Adarsh school) परिसर ते साने गुरुजी नगरमधील २० ते २५ चारचाकी, दुचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले होते. अचानक झालेल्या प्रकाराने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Umarga Crime News
Dhule Fire News : फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; हल्दीरामची उत्पादनेही जळून खाक, तब्बल दहा लाखांचं नुकसान

नुकसान झालेल्या वाहनमालकांनी तक्रार दिल्याने या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक डी.बी. पारेकर यांनी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पथके तयार केली होती. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या समीर अब्दुल रहिम शेख वय २१ रा. डिग्गीरोड उमरगा याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर, त्याने त्याचा साथीदार साहिल अयुब मासुलदार वय २२ वर्ष रा. उपजिल्हा रुग्णालयासमोर उमरगा याचे नाव सांगितले.

Umarga Crime News
Ulhasnagar : अनधिकृत होर्डिंग्ज पालिकेच्या रडारवर; 47 जणांना नोटिसा, विनापरवाना होर्डिंग काढले कापून

पोलिसांनी सोमवारी (ता.२०) रात्री राबविण्यात आलेल्या कोबिंग ऑपरेशनमध्ये साहिल पोलिसांच्या हाती लागला. साहिल हा ट्रक चालक आहे, त्यानेच समीरला बोलावून दोघेही मद्यधुंद अवस्थेत हा प्रकार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक पारेकर यांनी सांगितली. दरम्यान, पोलिसांनी आज दोघा आरोपींना वाहनफोडीच्या घटनास्थानावर नेण्यात आले होते. तेथील घटनाक्रमाची त्यांनी कबुली त्यांनी दिली. दुपारी दोघा आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. २३) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.