टायफॉईड, चिकनगुण्याने गंगापूर ग्रासले

चिकनगुन्या, टायफाईडचे रुग्ण वाढत असल्याने तालुक्यातील पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
टायफॉईड, चिकनगुण्याने गंगापूर ग्रासले
Updated on

गंगापूर : तालुक्‍यात सध्या व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्वाधिक लहान मुले आजारी पडत आहेत. वातावरणात बदल झाल्याने आरोग्यासाठी अपायकारक आहे. खासगी रुग्णालये लहान मुलांनी भरलेली दिसत असून मोठी गर्दी होत आहे. आधी कोरोना आणि आता चिकनगुन्या, टायफाईडचे रुग्ण वाढत असल्याने तालुक्यातील पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. (Aurangabad News)

व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने सर्दी, ताप, मळमळ, खोकला, अंग दुखणे घशात खवखव व उलटीसारखी लक्षणे वाढली आहेत. वातावरणातल्या बदलामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दूषित पाण्याच्या पुरवठ्याने गॅस्ट्रो, व मलेरियाच्या रुग्णांत देखील वाढ झाली आहे. तापेसह सर्दी, खोकला, घसा खवखवणे, उलट्या व जुलाब असा त्रास नागरिकांना होत आहे. हे वातावरण काविळ, न्यूमोनिया, टायफाईड, चिकन गुण्या, फ्लू आणि मलेरिया यासारख्या आजारांना पोषक असल्याने सर्व सामान्यांमधून चिंता व्यक्‍त केली जात आहे.

टायफॉईड, चिकनगुण्याने गंगापूर ग्रासले
आभाळ फाटलं : चाळीसगाव पाण्यात; कन्नड घाट दरडीखाली

ढगाळ वातावरण, कधी पाऊस, कधी ऊन अशा वातावरणात जिवाणू व विषाणूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुलांच्या आरोग्याला बसत आहे. प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना संसर्गजन्य आजाराचा धोका असतो. लहान मुलांना जास्त धोका हा वातावरणात बदलाने या व्हायरलचा धोका अधिक असतो. या वातावरणाचा व व्हायरलचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत आहे.

औषध फवारणीची मागणी

शहरात गेल्या काही दिवसांपासून चिकनगुनिया डेंग्यूसह आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत असे असले तरीही पालिकेचा आरोग्य व स्वच्छता विभाग सुस्तावलेला दिसून येत आहे. पालिकेने तातडीने घरोघरी डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पुढची आठ दिवस हा फिव्हर तसाच राहणार असल्याचा अंदाज आहे. याचा धोका लहान बालकांनाही आहे. नागरिकांनी कुटुंबीयांची विशेष काळजी घ्यावी. नागरिकांनी नेहमी पाणी उकळून पाणी प्यावे.

- डॉ. गणेश डोईफोडे

टायफॉईड, चिकनगुण्याने गंगापूर ग्रासले
Crime News: अहमदपूरमध्ये कीर्तनकाराला मारहाण

पैठणमध्ये लहान मुले सर्दी, ताप, खोकला आजारांनी ग्रस्त

पैठण : मागील काही दिवसांपासून पैठण शहरासह तालुक्यातील बदलत्या वातावरणाचा लहान मुलांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे लहान मुले सर्दी, ताप, खोकला या आजारांनी ग्रस्त असून सध्या पालक चिंतेत असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत तर नाही ना असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. दरम्यान, कोविड टास्क फोर्सने तिसऱ्या लाटेबाबत नकार दिला असून, बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांना त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही, लहान मुलांची काळजी घ्यावी, कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन पैठण येथील बालरोगतज्ज्ञांच्या वतीने करण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून लहान मुलांना ताप, सर्दी, खोकला यासारख्या साथीच्या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. ज्यामुळे पैठण शहरातील दवाखान्यात व रुग्णालयात लहान मुले उपचार घेत असल्याचे दिसून येत आहेत. पावसाळ्यात साथीचे आजार डोकं वर काढतात. त्यामुळे या काळात फ्लू किंवा फ्लूसदृश लक्षणांनी डॉक्टरांकडे येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. तसेच जमेची बाजू म्हणजे सध्या शाळा बंद असल्यामुळे या आजारांचे प्रमाण कमी आहे.

टायफॉईड, चिकनगुण्याने गंगापूर ग्रासले
सावकारांची नावं लिहून तरुणांची आत्महत्या!; पाहा व्हिडिओ

घरातील आजारी व्यक्तींपासून लहान मुलांना दूर ठेवा. बाहेरच थंड, तेलकट, फास्ट फूड हे पदार्थ लहान मुलांना देणे टाळावे. सर्दी, ताप, खोकल्याची सौम्य लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांना दाखवून घ्यावे. लहान मुलांचे हात स्वच्छ ठेवावेत व मास्क वापरावे. तसेच विनाकारण बाहेर फिरणे, थंड हवेत जाणे, कार्यक्रमाला जाणे टाळावे.

- डॉ. चेतन कासलीवाल, बालरोग तज्ञ, अरिहंत हॉस्पिटल, पैठण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.