औरंगाबादेत मोमोजच्या आमिषाने भामट्यांचा व्यापाऱ्याला १२ लाखांचा चुना

औरंगाबादेत येऊन शॉप सुरु करुन देईल असे इमेल आणि फोनद्वारे कळविण्यात आले.
Online vehicle saling fraud in ahmednagar crime news
Online vehicle saling fraud in ahmednagar crime newsesakal
Updated on

औरंगाबाद : ‘वाव मोमोज’ ची फ्रॅंचाईजी देण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याला तिघा भामट्यांनी तब्बल ११ लाख ९६ हजार रुपयांना चुना लावला. हा प्रकार डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान घडला. याप्रकरणी तीघा भामट्यांविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी औरंगाबादच्या (Aurangabad) सिंधी कॉलनीतील व्यापारी कैलास तलरेजा (४५) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचे बीएचआर इंडियन फुड दुकान आहे. डिसेंबर २०२१ मध्ये ते फेसबुक पाहत असताना त्यांना ‘वाव मोमोज’ या खाद्यपदार्थाच्या ब्रॅण्ड संदर्भात माहिती मिळाली होती. तलरेजा यांनी अधिक माहिती मिळवून त्यांनी wowmomofoods.co.in. या संकेतस्थळावर नाव, इमेल आयडी व संपर्क क्रमांक दिला दिला. त्यांना franchise@ wowmomofoods.co.in यावरून इमेल मिळाला. त्यावर बॅंक, आधारकार्ड, पॅनकार्ड शिक्षण व लोकेशन फोटो मागविले आणि पत्रक मिळाले. त्यात ब्रॅंडची माहीती व्यापार विषयक, फ्रॅंचाईजी घेण्याबाबत संपूर्ण माहीती दिली होती.

Online vehicle saling fraud in ahmednagar crime news
इतर पक्षांसारखे जात पाहून मी जेवणार नाही, मला जात कळत नाही : राज ठाकरे

एक कॉल आला अन्

सहा डिसेंबर रोजी तलरेजा यांना एक फोन आला. दरम्यान समोरुन फ्रॅंचाईशी घेण्यासाठी आठ लाख रुपये, आवश्यक वस्तु व सेवांचा पुरवठा करण्यात येईल असे सांगण्यात आले. तलरेजा यांनी फ्रॅंचाईशी घेण्याचे ठरविले, दरम्यान त्यांना अप्रोवल लेटर देत समोरुन नोंदणी शुल्क, फ्रॅंचाईसी शुक्ल, जीएसटी आदीसाठी रकमेची मागणी करत विविध सात प्रकारच्या खात्यात ११ लाख ९६ हजार रुपये रक्कम मागवून घेतली. तसेच ७ जानेवारी २०२२ रोजी एक व्यक्ती औरंगाबादेत येऊन शॉप सुरु करुन देईल असे इमेल आणि फोनद्वारे कळविण्यात आले. मात्र काही दिवस लोटले तरी कोणीच न आल्याने तलरेजा यांनी वेबसाईट आणि मेल आयडी तपासले असता, आपली फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यावरुन त्यांनी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली असता संशयित आरोपी संजीव कुमार, श्रीवास्तव आणि संदिप कश्यप या आरोपींविरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक संतोष पाटील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.