कराड यांच्या घरासमोर आंदोलन प्रकरण | काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या घरावर मोर्चा काढल्याचे प्रकरण
Bhagwat-Karad
Bhagwat-Karadsakal
Updated on

औरंगाबाद : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉँग्रेसच्या शंभर कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘महाराष्ट्रातील कामगार काँग्रेसने मदत करून घरी पाठविल्याने देशभर कोरोना वाढला’, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा काँग्रेसतर्फे निषेध सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी (ता.१२) दुपारी १२ वाजता कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्यासह कार्यकर्त्यांनी डॉ. भागवत कराड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा कॉँग्रेसने प्रयत्न केला; पण पोलिसांनी हा मोर्चा रस्त्यातच अडविला.

त्यानंतर तासभर ठिय्या देऊन कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

याप्रकरणी पोलिसांनी मो. हिशाम उस्मानी, डॉ. कल्याण काळे यांच्यासह रवींद्र काळे, संदेश बोरसे, मुजाहीद खान, हसनोद्दीक कट्यारे, अनिल पटेल, जगन्नाथ काळे, मोहसीनखान अजीज खान, शाम गावंडे, सय्यद हमीद, सय्यद अक्रम, सय्यद हबीब यांच्यासह ९० ते १०० जणांच्या विरोधात बेकायदा जमाव जमवून मोर्चा काढला, कोरोना नियमांचे पालन केले नाही, तसेच सार्वजनिक वाहतुकीत अडथळे निर्माण केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक इंगळे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.