पैठण : यंदाचा गळीत हंगाम साखर कारखान्याने सुरु केला आहे. परंतु अवकाळी पावसामुळे पैठण तालुक्यातील ऊसतोडी ठप्प झाली आहे. यामुळे ऊस गाळपावर परिणाम झाला आहे.उसाची आवक बंद झाल्याने पैठण तालुक्यातील संत एकनाथ-सचिन घायाळ शुगर साखर कारखाना, विहामांडवा येथील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना यांच्यावर उसाचे गाळप बंद करण्याची वेळ आली आहे.
गेल्या चार ते पाच पैठण तालुक्यातील सर्व भागात अवकाळी मोठा पाऊस पडत असून उसाच्या सऱ्यांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे दोन्ही कारखान्याचे गाळप मोठ्या प्रमाणावर घटले आहे. अवकाळी पावसाचा परिणाम सर्वच शेती घटकांवर झालेला आहे. ज्वारी, हरभरा, कांदा, करडई भाजीपाला पिकांसह फळ पिकांनाही याचा फटका बसला आहे. चार ते पाच दिवस अवकाळीचा चांगला मारा झाल्याने ऊसतोडणीलाही ''ब्रेक'' लागला आहे. आतापर्यंत पिकांचे नुकसान होत होते. पण आता ऊसतोडणीसारखी कामेही ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतकरी आणि कारखानदार कात्रीत सापडले आहेत.
अवकाळी पावसात ऊसतोड कामगारांची ही दैना झाली आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे उसाच्या शेतामधील सऱ्यांमध्ये पाणी साचल्याने ऊसतोडणी खोळंबली आहे. अर्धवट तोडणी झालेला ऊस बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे.शेतात पाणी साचल्याने एक ट्रॉलीने ऊस बाहेर काढण्यासाठी चक्क दोन ते तीन ट्रॅक्टर जोडावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसतोय शिवाय मोठा मनस्तापही सहन करावा लागत आहे. तालुक्यातील दोन्ही ही कारखान्यांचे गाळपही ३० टक्क्यांवर आले आहे. केवळ २० टक्के टोळ्या सुरू आहेत.
रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्यात गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर दररोज उसाचे गाळप व्यवस्थित सुरु होते. परंतु अवकाळीने ऊस तोडणीला व्यत्यय आला आहे. सध्या गाळप कमी आहे. उसाच्या फडात चिखलामुळे ऊसतोडणी मशिन, ट्रॅक्टर जाऊ शकत नसल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या ऊस फडातच ऊसतोड सुरू आहे.
- विलास भुमरे (चेअरमन रेणुकादेवी शरद कारखाना, विहामांडवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.