Aurangabad Update : मोसंबी, तूर, कापसाला अवकाळी पावसाचा फटका

शेकडो हेक्टरवरील मोसंबी फळबागाच्या अंबिया बहाराला बसणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Mosambi Bagh
Mosambi Baghesakal
Updated on

लोहगाव (जि.औरंगाबाद) : लोहगाव (ता.पैठण) (Paithan) महसूल मंडळात अतिवृष्टीनंतर दुसऱ्यांदा तीन दिवसांपासून वातावरण बदल्याने ढगाच्या काळोख्यात रिमझिम बेमोसमी पाऊस होत असल्याने अंबिया बहारासाठी ताणावर घेतलेली शेकडो एकर मोसंबी फळबाग (Mosambi Bagh), कांदा रोपटे, तूर, कापुस आदी पिकांवर परिणाम झाला असून गारठा वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी अचानक ऐन हिवाळ्यात वातावरण बदलून लोहगाव परिसरात काही ठिकाणी बेमोसमी पावसाने (Rain In Aurangabad) हजेरी लावली होती त्यानंतर पुन्हा मंगळवार (ता.३०) सकाळपासून अचानक आकाश ढगाने झाकोळून तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसून काल रात्री दीड वाजेपासुन ते गुरुवारी (ता.दोन) दिवसभर लोहगाव व परिसरातील गावांत रिमझिम पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण होऊन हूडहुडीने नागरिक त्रस्त होते. (Lohagaon Circle)

Mosambi Bagh
औरंगाबाद-जालना महामार्ग ठरतोय धोकादायक, विविध कामांचा फटका

याचा परिणाम जनजीवनावर झाला होता. दरम्यान या बेमोसमी पावसाचा लोहगाव महसूल मंडळातील शेकडो हेक्टर मोसंबी फळबागाच्या अंबिया बहाराला बसणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर अतिवृष्टीच्या तडाख्यातुन थोडेफार वाचलेली कापूस, तुर, मठ, रब्बी हंगामातील कांदा रोपे, ज्वारी, गहू आदी पिकाला धुई व पावसाचा फटका बसणार आहे. यामुळे शेतकरी यावर्षी खरीप, रब्बी हंगाम उत्पन्नाअभावी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

मोसंबी बागेचा अंबिया बहार धरण्यासाठी टाचणी, शेणखत, मेहनत करून बाग ताणावर घेतला असताना अवकाळी पाऊस आल्याने आता गेल्या वर्षी प्रमाणे याही वेळी बहाराला फटका बसणार आहे.

- शेख अमिनखाँन, शेतकरी, लोहगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()